माजले बिल्डर आणि इतर
बिल्डरच्या गुंडांची मारहाण हे तर नेहेमीचेच आहे.. आज जाग आली काय?? बिल्डर लोक असा चोरून FSI नेहेमीच विकत असतात.. आणि त्यांना कधीच शिक्षा होत नाही.. कारण महापालिके पासून, पोलीस, नगरसेवक आणि टाऊनशिप प्लांनिंग च्या सर्व कुत्र्यांना त्यांनी तुकडा टाकलेला असतो.. असली हि बिल्डर ची जात ठेचायला पाहिजे.. नुसते हेच नाहीतर रिकाम्या प्लॉटमध्ये तर खूप घोटाळे करतात. एक प्लॉट ४ लोकांना विकतील, अतिक्रमण करील, जर जागा रिकामी असली तर लगेच तिथे अतिक्रमण करतील आणि तिथे कुठल्या तरी राजकीय बिल्डरची पाटी लावतील म्हणजे जर कुणी आलेच तर धाक बसेल.. आणि मग लोकल गुंड लोक आणि बिल्डर ती जागा हडप करून त्यावर बिल्डींग बांधतील आणि विकतील.. ज्याची जमीन गेली त्याला जर नशीब असले तर थोडे फार पैसे मिळतील नाहीतर ते पण नाही.. पोलीस लोक FIR लिहून घायचे पैसे घेतात.. आणि जर सरळ मार्गाने त्यांना सांगितले तर तुमच्यावरच कसलातरी फालतू गुन्हा दाखल करतात.. साले सगळेच हलकट.. सरकार कुठल्याही पक्षाचे असो.. त्यांचे एकच काम पैसे खाणे.. लोकांशी काहीही देणे घेणे नाही.. --------------------------------------------------------------------------...