मुश्रीफ : एक मूर्ख माणूस

"हु किल्ड करकरे" या पुस्तकावरचा म.टा. मधला लेख वाचला.. कालच लोकसत्ता मध्ये थोड्या वेगळ्या सुराचा लेख होता.. आणि आज महाराष्ट्र टाईम्स मधला लेख वाचून तर तळपायाची आग मस्तकात गेली.
या मूर्खाची किती अक्कल चालावी बघा.. आयबी ही देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी काम करणारी गुप्तचर संस्था आहे की घातपात करणारी एजन्सी असा संशय निर्माण व्हावा असा घटनाकम या पुस्कात रंगवण्यात आलाय.
हे कसाब चे घोंगडे भिजत ठेवले न आपण एक वर्ष त्याचे हे परिणाम.. मुश्रीफ सारखी बिनडोक कुत्री लागलीत भुंकायला.. हे मूर्ख पात्र इन्स्पेक्टर जनरल होते म्हणे.. तेलगीचा घोटाळा उघडकीस आणला या महाशयांनी.. मग आता काय बुद्धी भ्रष्ट झाली का या मूर्खाची.. ह्याला पाकिस्तानी हेर का म्हणू नये ? पोलीस म्हणून निवृत्त झाला तर अक्कल गहाण पडली कि काय ?

आणि महाराष्ट्र टाईम्स ला तरी काय गरज आहे असे लेख लिहायची देव जाणे.. लोकांच्या प्रतिक्रिया फिल्टर नाही करत किंवा छापत नाहीत.. तेव्हा त्यांच्या मध्ये दम नसतो.. आणि हे असले लेख छापतात..

त्यातले काही वाक्ये खालीलप्रमाणे
१. अजमल कसाब २६ / ११ च्या हल्ल्याआधी पाकिस्तानातून आलेला दहशतवादी नसून तो तीन वर्ष आयबीच्या ताब्यात होता.
२. इन्स्पेक्टर मोहन शर्मा दहशतवाद्यांचा सामना करताना शहीद झाले नसून आयबीने त्यांचा पध्दशीर गेम केला.
३. २६ / ११ च्या दहशतवादी हल्ल्यात ताज आणि ओबेराय ट्रायडण्टवर झालेला दहशतवादी हल्ला पाकिस्तान पुरस्कृत असला तरी कामा हॉस्पिटल आणि सीएसटी स्थानकावर झालेला हल्ला आयबी पुरस्कृत होता आणि तो करकरेंना संपवण्यासाठी करण्यात आला होता.
४. सर्वात महत्वाचं म्हणजे मुंबईच्या किना-यावर ट्रॉलरमधून आलेल्या दहशतवाद्यांची संख्या केवळ आठ होती. कामा हॉस्पिटलकडे फायरिंग करणारे दोन दहशतवादी हे आयबी पुरस्कृत होते. त्यांनीच करकरेचा बळी घेतला. हे अतिरेकी मराठी भाषक होते अस सांगून संशयाची सुई संघाकडे वळवण्याचाही त्यांनी प्रयत्न केलाय. मालेगाव बॉम्बस्फोटात संघाचा हात असल्याचं उघड होत असल्यामुळे आयबीने हा कट रचला.एटीएसचे सध्याचे प्रमुख के. रघुवंशी आयबीला सामील होते अस धक्कादायक दावे करून मुश्रीफ यांनी त्यांनाही खलनायक बनवण्याचा प्रयत्न केला आहे.
५. गोपनीय माहिती आणि गोपनीय कारवाई असा शब्दांचा खेळ करून आयबी सरकारला अंधारात ठेवते आणि आपला जातीयवादी अजेण्डा राबवते.

वाचून तर इतका संताप झाला माझा कि असे वाटते कि मुश्रीफ ला चपलांनी थोबाडावे.. याला काही प्रमाणात सरकारची देखील चूक आहे.. नसते घोंगडे भिजवत ठेवायची सरकार ला हौस च आहे.. अफझल गुरु पासून कसाब पर्यंत.. आणि अमरसिंग सारखे भिक्कारडे चोर बाटला हौस बद्दल काहीही बरळत आहेत.. असल्या हरामखोरांना का नाही हे दहशतवादी मारत असा प्रश्न जरूर पडतो..

Comments

Popular posts from this blog

थोडक्यात १४/१२/२००९

अवधूतची फरफट सुरूच...'झेंडा'ची डीव्हीडी पाठवली नारायण राणेंकडे!

वरळी सी फेस सुसाट गाडी चालवणार्यांना शिक्षा झालीच पाहिजे