स्वाभिमान संघटनेच्या मोर्चावर लाठीमार, एक ठार
हे वाचले http://72.78.249.124/esakal/20091203/4694029027472525415.htm आणि वाटले बरोबर आहे.. नितेश राणे आता राजकीय प्रष्ट होऊ पाहतो आहे.. काहीतरी सतंत करायला हवा.. मुळात पाणी प्रश्नावर मोर्चा काढून तोदादा निघणार आहे का.. आणि मोर्चा काढणार, ट्राफिक ची वाट लावणार आणि वर महापालिकेत घुसायचा प्रयत्न करणार.. जर तिथे मोडतोड केली असती ह्या लोकांनी तर बाकीची कामे अजून रखडली असती ना.. आणि मोर्चाचे टायमिंग बघता महापौर निवडणुकीत झालेला पराभवाची निराशा तर नाही ना असा विचार मनाला चाटून गेला..
जर प्रत्येक जण असेच मोर्चे काढून महापालिकेच्या कामामध्ये अडथळे आणू लागला तर कसे चालेल?
नितेश राणेंचा मोर्चा होता, त्यावर लाठीमार झाला आणि त्या मध्ये एक मृत्यू झाला तर हि जबाबदारी पोलिसांइतकीच नितेश राणे ची नाही का.. जर मोर्चाचे नेतृत्व मोर्चाला सांभाळू शकत नसेल तर मोर्चे काढायचेच कशाला ?
जर नितेश राणेला एवढीच पाणी प्रश्न मिटवायची हौस आहे तर त्याने कोकणात, आपल्या स्वतःच्या मतदार संघात काहीतरी क्रांती करून दाखवावी.. जेणे करून सर्व देश ते आचरणात आणेल.. पण हे राजकारणी चोर असे काहीही करणार नाही.. त्यांना कुठल्याही गोष्टीचा अजेंडा करून स्वतःभोवती प्रसिद्धी फिरवायची असते.. निव्वळ कुचकामी असतात..
अर्थात बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया सकाळ च्या मुर्खांनी छापल्या नसतील त्यांनी इथे आपले मन मोकळे करा..
Comments
Post a Comment