१० दिसेम्बर २००९ - बातम्या आणि प्रतिक्रिया

दारुबंदीच्या राणेंच्या मागणीवर विरोधक आक्रमक (http://epaper.esakal.com/esakal/20091210/4850356728539778721.htm)

छान !! विरोधक दारुबंदी सारख्या महत्वाच्या विषयाच्या विरुद्ध टीका करतात आणि "विरोधकांनी याच मुद्‌द्‌यावरून विधान परिषदेचे कामकाज रोखून धरले होते." याने काय नुकसान झाले?..
धन्य ते विरोधक आणि धन्य ते सरकार..
एक म्हणतो कि दारूबंदी करा आणि एक मंत्री म्हणतो कि सर्व धान्यापासून दारू गाळा..

------------------------------------------

'तेलंगण'मुळे आंध्रात तीनशे कोटींचे नुकसान (http://epaper.esakal.com/esakal/20091210/5363106276985390691.htm)

मला हे वेगळे राज्य का असावे हे कधीच नाही कळले.. झारखंड चे आपण वेगळे राज्य केले.. काय झाले तिथे? मधु कोडा सारख्या हरामी लोकांनी त्या नाव राज्याला अजून नागडे केले.. आदिवासींचे पुनर्वसन तर दूर त्यांनाच लुटले..

आता तेलंगणा झाले आपल्याकडे वेगळ्या विदर्भाची मागणी जोर धरू लागेल... आणि तिथे नक्की नैसर्गिक संपत्ती आणि जंगलांच्या जोरावर ते राज्य चालवणार .. अमरावती, अकोला. वर्धा, वाशीम इथे कुठली इकोनोमी आहे ते मला तरी नाही माहित.. नागपूर त्यातल्या त्यात मोठे शहर आणि आर्थिक हब.. गोंदिया ला जंगले.. म्हणजे जंगले कापायची, मधु कोडा सारखे खाणीचे अर्थकारण करायचे ?? आपलेच राज्य आणि आपलाच कायदा ..
-------------------------------------------------------------------------------------

...आणि मूकबधीर प्रसन्न बोलू लागला (http://epaper.esakal.com/esakal/20091209/5082514877884532792.htm)

हि मात्र झक्कास न्यूज आहे.. अथक परिश्रम आणि आत्मविश्वास या जोरावर काय नाही होत ? हे उत्तम उदाहरण आहे.. माझ्या शुभेच्छा.. आणि प्रसन्न एक दिवस मोठा माणूस होऊन जगाला दाखवून देईल कि त्यामध्ये काहीही कमी नाही.. एडिसन देखील बहिरा (पूर्ण नव्हे) होता पण किती मोठा माणूस झाला तो.. असेच प्रसन्न देखील होवो अशी इच्छा..

--------------------------------------------------------

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे विदर्भात 'विष खा' आंदोलन (http://epaper.esakal.com/esakal/20091210/5142301179109273576.htm)

आंदोलनाचा हेतू चांगला आहे पण मार्ग फारसा पटलं नाही.. सरकार नुसते थोबाड वर करून जय जवान जय किसान म्हणते.. आणि शेतकर्याला मदत मिळत नाहीच.. नुसत्या योजना.. आणि आरोळ्या.. प्रत्यक्षात जमीन कसनार्याच्या झोळीत काहीच नाही.. विदर्भात तर भयाण आहे स्थिती.. पाणी नाही.. वीज नाही.. आमच्या गावाला फक्त १८ तास लोड शेडींग असते.. आणि उन्हाळ्यात थोडे जास्त म्हणजे २१ तास.. हे सरकारी मंत्री आणि दलाल ह्यांना ३५ डिग्री मध्ये २१ तास बसवले तर काय होईल? पक्ष कुठलाही असो.. सरकार कुणाचेही असो शेतकरी आणि सामान्य माणूस मारणार हे नक्की.. इथे बिल्डर आणि खाजगी कंपन्यांना भरपूर सवलत.. आणि जो पिकवतो त्याला घण्टा !! वा रे न्याय..
मध्यंतरी एक चांगला मराठी चित्रपट पाहिला होता. "गोष्ट छोटी डोंगराएवढी".. त्यामध्ये एकदम बरोबर चित्रित केले आहे हाल शेतकर्याचे.. माझ्या स्वानुभवा वरून सांगतो गाव आणि तालुक्यात राहून शेती वा छोटा व्यवसाय करायला भरपूर प्रोब्लेम्स आहेत..
१. बनावट बियाणे - बर्याच कंपन्या तर राजकीय लोकांच्या आहेत.. एकदा पेरून नाही उगवले तर दुबार पेरणी शिवाय काही पर्याय नाही बळी राजाला.. नाहीतर त्या वर्षी जाऊ द्यायचे हे परवडत नाही.
२. निकृष्ट खते - हरामखोर लोक विकतात.. आणि खात टाकून काहीच नाही होत.. मग बसायचे हरी हरी करत..
३. वीज - वीज असते ना !! २-३ तास दिवसातून.. रात्री २ ते सकाळी ४ नक्की असते.. म्हणजे शेतकरी दिवसभर राबणार.. आणि रात्री पाण्यासाठी परत शेतात जाणार..
४. पाणी - कोरडवाहू शेती फक्त पावसाच्या पाण्यावर चालते.. जर विहीर असली तर उपसा नाही होत. कालवे आणि कोल्हापूर टाईप बंधारे फक्त कागदावर.. आणि बांध घातला तर त्याचे पत्रे आणि इतर साधने चोर चोरून नेणार..
वीज आहे तर पाणी नाही आणि पाणी आहे तर वीज नाही.
५. रस्ते - अरे राम.. जर शेती माल तालुक्याला जाऊन विकायचा म्हणजे दिव्यातून पार पडावे लागते..
६. फेडरेशन - सरकारी खरेदी.. इथे तर गोनी उचलणाऱ्या मजुरापासून अधिकारी सगळे पैसे मागतात..

मग असे असल्या वर शेतकरी आत्महत्या करतात नाही तर डाकू होतात.. सरकारच नाही का जबाबदार याला ?

Comments

Popular posts from this blog

थोडक्यात १४/१२/२००९

अवधूतची फरफट सुरूच...'झेंडा'ची डीव्हीडी पाठवली नारायण राणेंकडे!

वरळी सी फेस सुसाट गाडी चालवणार्यांना शिक्षा झालीच पाहिजे