९ डिसेंबर २००९ - बातम्या आणि प्रतिक्रिया

सकाळ चे हिझडे प्रतिक्रिया छापत नाहीत म्हणून हा घाट...

बातमी - भाजपवर विश्‍वास ठेवणे ही नरसिंह रावांची चूक (http://72.78.249.124/esakal/20091208/5333511778995326923.htm)

प्रतिक्रिया - उकरा.. सगळे उकरा.. आणि देशाला परत दंगलींच्या खाईत लोटा.. राजकारना पायी लोकांचे जीव घेतील.. आता जे झाले ते झाले ना.. काय उपयोग आहे ह्या गोष्टींचा?
-------------------------------------------------------------------------------------------------
बातमी - शिवसेना-भाजपचे पाणी-माफियांशी संधान - नीतेश राणे
प्रतिक्रिया - आत्ताच कसे ह्याला पाणी आठवले.. उगाच आपले काहीतरी.. दुसर्यावर टीका करून काहीही मिळत नाही.. मग पालिके मध्ये कॉंग्रेस आहे ना.. हा प्रश्न प्रसिद्धी माध्यमात उठ्व्ल्यापेक्षा पालिकेत उठवला तर जास्त योग्य नाही का.. युसलेस माणूस.. "स्वाभिमान' ही राजकीय नव्हे; तर सामाजिक प्रश्‍नासाठी लढणारी संघटना असल्याचे सांगितले." असे म्हणतो थोबाड वर करून.. कुठले सामाजिक प्रश्न सोडवले स्वाभिमान ने ? भरपूर आहेत.. गावान्माध्या जा.. शेतकरी आत्महत्या, नोकरशाही, धान्याचे दलाल हे बघा आधी..

---------------------

बालाजी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षास अटक (http://72.78.249.124/esakal/20091209/5390167128727827737.htm)

ह्या हलकट शिक्षण सम्राटांनी शिक्षणाच्या गुणवत्तेची पार वात लावली आहे.. पैसे खातात निर्लज्जासारखे आणि गुणवत्तेचा निकष न लावता प्रवेश देतात.. बिल्डींग फंड च्या नावाने देणगी घेतात.. आणि नुसत्या वेड्या सारख्या बिल्डिंगा बांधतात.. शाळा बांधतांना काही कमीतकमी निकष हवेत कि नको ? उ.दा. खेळायला मैदान.. किती शाळांना असते मैदान आज काल? आणि थोबाड वर करून देणगी घेतात ना..
सर्वात वाईट म्हणजे ह्या चोर शिक्षण सम्राटांनी सामान्य आणि गरीब लोकांचा शिक्षणाचा हक्क हिरावून घेतला आहे.. जिथे कसे बसे महिना काढायचा तिथे शिक्षणा साठी पैसे ओता.. आणि शिक्षणाची प्रतीमध्ये मात्र काहीही सुधारणा नाही.. एका वर्गात ८० मुले कोंबायची. आणि ह्यांच्या मड्यावर पैसे ओतायचे... फी खेरीज अनुक फंड तमुक फंड च्या नावाने भीक मागत राहणार हे लोक..
बरेचसे शिक्षण सम्राट राजकारणी पण आहेत.. उ.दा.
पतंग कदम.. -- ह्याने तर भारती विद्यापीठ च्या नावाने किती कोटी पैसे खाल्लेत याला काही मर्यादाच नाही.. आणि परत आता राजकीय धेंड असल्यामुळे बरयाचशा मोक्याच्या जागा हादप्ता येतात.. मला चांगले आठवते कि १९९० ला अभियांत्रिकी साठी प्रवेशासाठी १ लाख रुपये देणगी होती बाहेरच्या विद्यार्थ्यांना.. मग जशी इछुक विद्यार्थ्याची गुणवत्ता (?) तसे डोनेशन कमी जास्त होणार.. आणि मेडिकल साठी ५ लाख ते १० लाख.. बापरे हे असे देणगी देऊन होणार डॉक्टर ??

वी. दा. कराड - अलीकडचे शिक्षण सम्राट.. MIT या गोंडस नावाखाली किती पैसे खावेत याला काही ताळतंत्र ?? डोंगर च्या डोंगर विकत घेऊन भुइसपात करायचे.. शाळा, महाविद्यालये, तंत्र शिक्षण, अभियांत्रिकी, मेडिकल, MBA चा बाजार मांडला ह्याने..

डी वाय पाटील. - न बोललेलेच बरे.. आता राज्यपाल आहेत त्रिपुराचे.. आता तिथे पण एखादे विद्यालय काढतील स्वतःच्या नावाने..

एम. एन. नवले - या तर माणूस अलीकडचा शिक्षण सम्राट.. ह्याने सिंहगड च्या नावाने शाळा कॉलेज अभियांत्रिकी तंत्र शिक्षण काय वाट्टेल ते काढले.. अलीकडेच ह्याने एक स्प्रिंगडेल नावाची शाळा एरंडवने, पुणे इथे उघडली.. ती जागा आधी बागेसाठी आरक्षित होती.. मग ऐकले कि ती जागा प्राथमिक शाळेसाठी आहे.. मग ह्या चोराने महापालिकेच्या कुत्र्यांबरोबर संगनमत करून ती जागा हडपली.. आणि तिथे चक्क ११ मजली इमारत उभी केली. अर्थात प्रवेश देणगी लाखांमध्ये असेल. आणि रेसिदेन्शिअल ठिकाणी शाळा उभी केली तर तिथे किती ट्राफिक होईल आणि तिथे रस्त्याची काय व्यवस्था आहे.. मुलांना खेळायला मैदान आहे की नाही हे कोन याचा बाप बघणार का ?? महापालिकेची कुत्री पैसे दिले तर शेणातली ज्वारी उचलून खातील.

असे सामान्य जनतेचा हक्क हिरावून घेणारे शिक्षण सम्राट आणि डुक्कर कसाब मला तर एकाच नाडीचे वाटतात..

----------------
बातमी - उपचाराअभावी घरी परतणारी गर्भवती लोकलमध्ये प्रसूत
प्रतिक्रिया - "डॉक्‍टरांनी तिला उपचार करण्यास नकार देत थेट मुंबईतील सायन येथील पालिका रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला" म्हणजे प्रसूती जवळ आल्यावर मदत करण्याऐवजी इकडे जा तिकडे जा असे डॉक्टर सांगणार.. आणि मग असहाय्य बाई लोकल ट्रेन मध्ये बाळाला जन्म देणार.. अरे रे.. भारतात विचारशक्ती, सहिष्णू वृत्ती जवळपास संपलेली आहे..

Comments

Popular posts from this blog

थोडक्यात १४/१२/२००९

अवधूतची फरफट सुरूच...'झेंडा'ची डीव्हीडी पाठवली नारायण राणेंकडे!

वरळी सी फेस सुसाट गाडी चालवणार्यांना शिक्षा झालीच पाहिजे