न्यायाचे धिंडवडे

बलात्काराची राजधानी असलेल्या दिल्ली च्या बाजूचे हरियाना, इथे १९ वर्षापूर्वी एका हलकट पोलीस अधिकार्याने एका १४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला.. त्या बलात्कार नंतर त्या मुलीच्या कुटुंबाला पोलिसांनी दिलेला त्रास आणि त्यातूनही ती केस दाबण्याचा प्रयत्न केवळ संतापजनक आहे..
आणि आपल्या भिक्कार न्यायालयाने १९ वर्षांनी त्या नराधम पोलीस अधिकार्याला किती सजा द्यावी ? सहा महिने सक्तमजुरी ?? अरे जिथे अल्पवयीन मुलीवर बलात्काराला फाशी व्हावी तिथे फक्त ६ महिने.. न्यायाधीश काय नशेत आहे का ? कि त्याला पण दिलेत पैसे आणि केले थोबाड गप्प? कसा सामान्य जनता विश्वास ठेवणार ह्यांच्यावर ?
हे तर न्यायावर आणि न्यायालयावर लघुशंका केल्यासारखे आहे..
आणि ह्या नराधम राठोडला पोलिस महासंचालकपदावर बढती दिली.. हे असले सरकार आणि हे असले न्यायालय..
मी थुंकतो असल्या न्यायव्यवस्थेवर..
राठोडला निवृत्तीनंतर सात वर्षांनी शिक्षा सुनावली जावी हे या व्यवस्थेचे यश नसून, तो ही व्यवस्था किती सडलेली आहे, याचा लाजिरवाणा पुरावाच आहे..
कुणी "रंग दे बसंती" मधल्यासारख्या वीरांनी ह्या असल्या सडक्या लोकांना शिक्षा दिली पाहिजे..
आपण काय फक्त विशफुल थिंकिंग करणार आणि देव रुचिता गिर्होत्रा च्या आत्म्याला शांती देवो म्हनणार !!

Comments

Popular posts from this blog

थोडक्यात १४/१२/२००९

अवधूतची फरफट सुरूच...'झेंडा'ची डीव्हीडी पाठवली नारायण राणेंकडे!

वरळी सी फेस सुसाट गाडी चालवणार्यांना शिक्षा झालीच पाहिजे