वरळी सी फेस सुसाट गाडी चालवणार्यांना शिक्षा झालीच पाहिजे

"वेगावर नियंत्रण आणण्यासाठी वरळी सी फेसवर काही दिवसांपूर्वी 'स्पीड गन' ठेवल्या. या गनमधून प्रत्येक गाडीचा वेग मोजता येतो. वेगाची मर्यादा ओलांडली तर ड्रायव्हरला दंड होतो."
असले सुसाट चालवणारे रस्त्यावरून चालत असलेल्या लोकांचा जीव घेतात.. आणि आपले महान न्यायालय त्यांना शिक्षा करू शकत नाही ..

सलमान खान, संजीव नंदा, परेरा पासून परवा परवा त्या कुणी सोधीने एकाचा जीव घेतला दिल्ली मध्ये आपल्या मर्सिडीज खाली..

अशी हलकट प्रवृत्ती थांबवायची असेल तर स्पीड गन नको खरीच गन ठेवायला हवी.. केले उल्लंघन घाल गोळी.. असे ५-५० मारू देत मग येतील सगळे ठिकाणावर.. सिग्नल तोडून जाणारे तर झेब्रा क्रोस्सिंग वर चालणार्यांकडे लक्ष पण नाही देत.. आणि मग बिचारे चालणारे कधी कधी जखमी होतात आणि हे चोर जातात पळून.. असल्या लोकांना देखील तसेच मारले पाहिजे त्याशिवाय थांबणार नाही हे..

मला माननीय लेखक पु.ल. देशपांड्यांच्या असा मी असा मी (किंवा माझे पौष्टिक जीवन) मधले वाक्य आठवते.. "आपल्या लोकांच्या हंटर हवा" आणि तेच खरे आहे.. २-४ हंटर पडले बुडावर की सुधारतील बरोबर.. त्याशिवाय अवघड आहे.

Comments

Popular posts from this blog

थोडक्यात १४/१२/२००९

अवधूतची फरफट सुरूच...'झेंडा'ची डीव्हीडी पाठवली नारायण राणेंकडे!