बातम्यांवर प्रतिक्रया (7,8 dec 2009)

बातम्यांवर प्रतिक्रया -- भुक्कड सकाळ (म.टा.)च्या moderators ना लाज वाटते छापायला प्रतिक्रिया..

१. आता प्या मका, ज्वारी, बाजरीची दारू! (http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5313250.cms)
बघा बघा.. महाराष्ट्र किती पुढे जातोय.. प्रगतीशील आहे.. इथे लोकांना खायला नाही आणि हे हरामखोर चोर मंत्री अशा योजना काढत आहेत.. काय अक्कल आहे ह्या भिक्कारड्यांची.. शेतकरी थोडे जास्त पैसे येतात म्हणून आपले धान्य गुत्त्यांना विकणार.. आणि सरकार त्यातून महसूल कमावणार.. आणि सामान्य बाजारपेठेत ज्वारी, मका आणि बाजरी चे भाव आकाशाला भिडणार.. मग सामान्य लोकांनी भूक लागल्याची जाणीव होऊ नये म्हणून हि दारू प्यायची का गणेश नाईक.. अक्कल आहे का या मंत्र्याची ठिकाणावर.. दारूचे दुष्परिणाम माहित नाहीत कि काय त्याला.. आणि त्याचा मालक अशोक चव्हाणचा काय गुडघ्यात मेंदू आहे का.. अशा प्रस्तावाला थोबाड वर करून मान्यता द्यायला...

आमदारांचे निलंबन मागे घेतल्यास सरकारची 'थू' :आझमी
आता झाले ते गेले ना.. ह्या अबू आझमीने आडमुठेपणा केला आणि खाल्ली कानाखाली.. पुढे त्याचे किती कौतुक.. पण काही लोक कुत्र्याच्या शेपटासारखे असतात.. वाकडे ते वाकडेच.. आता अधिवेशनात महत्वाचे विषय नाही तर हिंदी बोलायचे कि मराठी चे चर्वण चालणार? अरे या चोरांना आपणच आपले कामे करायला निवडून दिले ना ? आपल्याच पैशांवर हे स्वतःचे तुणतुणे वाजवणार..
आणि हा अबू आझमी एक तर गुंड आहे.. दाऊद च्या पार्ट्यांना हजेरी लावणार. त्याला बॉम्ब स्फोटात मदत करणार. उ.प. मधून येऊन इकडे दादागिरी करणार.. आणि आपण ते गुमान ऐकून घेणार.. राज ठाकरे ला इतकीच हौस आहे तर त्याचे धंदे का नाही बंद करून टाकत? तिथे का शेपूट घालायचे?
म.न.से. ते नाही करणार उगाच अधिवेशनाचा वेळ वाया घालवणार.. जिथे शेतकरी आत्महत्या, वीज टंचाई, पाणी टंचाई, दुष्काळ यावर चर्चा करायची तिथे मान पान, भाषा हे विषय रंगणार.. अधिवेशन आणि सामान्य लोक गेले तेल लावत.. त्याचे प्रश्न सोडवले काय आणि नाही काय ते काय करणार ना? ? म्हणजे इंग्रजी मध्ये काय म्हणतात taking for ride तसे आहे..

नवी मुंबईत पाच किलो युरेनियम जप्त
आता हेच राहिले होते.. म्हणजे लहान पोरांनादेखील ठाऊक आहे कि युरेनिअम अणु बॉम्ब आणि अणु भट्ट्यांमध्ये वापरतात.. ह्याची देखील तस्करी.. अरे हे काय चालू आहे आपल्या देशात.. मोठा प्रश्न हा आहे की युरेनिम सारखा धातू कडेकोट संरक्षणात असतो तो बाहेर पडलाच कसा? ते पण ५ किलो!! कुणी चोरले ते.. त्यांचा अतिरेक्यांशी काही संबंध होता का ? आणि असला तर त्यांना सरळ मारून टाकायला पाहिजे.. माहिती काढून अर्थात.. त्यांच्या कारवित्या धन्याचे कुठल्या राजकीय नेत्याशी संबन्ध आहेत का. जर असतील तर त्या नेत्याला देखील फाशी द्यावी.. नोकरशहांना देखील हीच शिक्षा.. असल्या ढिसाळ कारभाराला आपण याआधी कितीवेळा बळी पडलो आहोत.. तरी हे चालूच आहे? कधी सुधारणार आपण ? आणि कधीच नाही हे उत्तर असले तर आपला शेवट फार दूर नाही..

पोलिसांवर गुन्हेगारांना 'सॅल्यूट' करण्याची वेळ - अरविंद इनामदार (http://epaper.esakal.com/esakal/20091208/4889102099125547849.htm)
आता जर गुन्हेगार राजकारणात गेले आणि मंत्री झाले तर पोलिसांना काही पर्याय आहे का ? राजकारण आणि गुन्हेगारी हे भारतामध्ये एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.. दोन्हीही एकमेकांना पूरक आहेत.. गुन्हेगारांना शिक्षा होत नाही आणि आपला कायदा फक्त सामान्य लोकांसाठी आहे.. ज्यांच्याकडे पैसे आहेत ते हा कायदा विकत घेतात. राजकारणी तर प्रत्येक प्रकरणात निर्दोष कसे सुटतात हे मला अजून कळले नाही.. कदाचित न्याय देणार्याला देखील स्वतःच्या न्याय्क्षमते बद्दल खात्री नसावी.. आणि जीवाची भीती असावी.. शेवटी तो देखील माणूसच आहे ना..
जर न्याय नाही, कायदा हवा तसा वळवता येतो, पोलीस निष्क्रीय आहेत आणि राजकीय हस्तक्षेप न्याय प्रक्रियेत होत असेल तर मग आजचा भारत आणि जंगली लोकांचे राज्य या मध्ये काय फरक राहिला ? सध्याचा भारत जंगल राज आहे कि काय?

Comments

Popular posts from this blog

थोडक्यात १४/१२/२००९

अवधूतची फरफट सुरूच...'झेंडा'ची डीव्हीडी पाठवली नारायण राणेंकडे!

वरळी सी फेस सुसाट गाडी चालवणार्यांना शिक्षा झालीच पाहिजे