कसाबवर ३१ कोटीचा खर्च झालाय

लांछनास्पद बातमी आहे हि.. भारत सरकार जगाला नक्की काय सिद्ध करून दाखवू इच्छिते ?? कि आम्ही किती महान न्याय दाते आहोत ?? आणि तो हलकट अजून मागण्या वाढवतोय.. त्याला चांगले जेवण हवे.. वाचायला उर्दू वर्तमान पत्र हवे.. पुस्तके हवीत.. इथे ज्या लोकांच्या तोंड चा घास त्याने हिसकावला त्याची काहीही चाड नाही सरकारला.. आणि असल्या नराधमाचे चोचले पुरवत आहेत.. हेच का आपले लोकमान्य सरकार ?? म्हणजे सरकारला अतिरेकी आणि गुन्हेगारांवर खर्च करायला हवा आणि पोलिसांना नवीन हत्यारे द्यायला खर्चाला परवानगी आणि लाल फीत?? असे कसे.. कसाबसाठी आर्थर रोड जेलमध्ये बुलेटप्रुफ आणि बॉम्बप्रुफ असे खास तुरुंग (स्पेशल सेल) तयार करण्यात आले आहे. स्फोटकांनी भरलेला ट्रक जोरात आपटला तरी या तुरुंगात ठेवलेल्या कसाबला काहीही होऊ नये अशी व्यवस्था करण्यात आली आहे. जे जे हॉस्पिटलच्या आवारातही कसाबसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तब्येत बिघडल्यास कसाबला ताबडतोब जे जे मध्ये आणून त्याच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांची फौज सज्ज आहे. मागील काही महिन्यात कसाबला जे जे मध्ये नेण्याची वेळ आली नसली तरी वेळ पडल्यास त्याच्या प्रकृतीची हेळसांड होऊ नये म्हणून तजवीज करण्यात आली आहे. म्हणजे सामान्य माणूस उपचारांसाठी वात बघत बसेल पण ज्या डूक्कराने १६० लोक मारलेत त्याच्या साठी डॉक्टर तयार.. वा रे व्यवस्था.. वर्षभरापूर्वी पोलिसांशी झालेल्या संघर्षात जखमी झालेला कसाब पळण्याच्या प्रयत्नात होता. त्यावेळी ओंबाळे यांनी प्राण पणाला लावून त्याला जिवंत पकडले होते. या कारवाईत ओंबाळे शहीद झाले आणि क्रुरकर्मा कसाबला सरकारने जे जे मध्ये तब्बल २४ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले होते. तेव्हापासून आज वर्ष होत आहे, कसाबच्या जिवाची प्रचंड काळजी घेण्यात येत आहे. त्याचे मारलेले साथीदारांचे मुडदे जतन करून ठेवलेत.. करदात्यांच्या पैशांनी.. का ??? इतका निर्लज्ज पणा ??? अरे मूर्खांनो अशी विषवल्ली जिवंत ठेवली तर ती एक दिवस तुमच्या वरच उलटेल.. दहशतवादी हल्ला होऊन एक वर्ष झाला तरी यांचा तपास अंतिम टप्प्यात आहे हे नेहमीचेच आहे . हे म्हणजे शहिद आणि जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. त्याऐवजी पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केला असता तर बरे झाले असते. खरे म्हणजे साक्षी पुरावे गोळा करून दिवस पुढे ढकलणे म्हणजे सरकारचा नामर्दपणा आहे. कायदा आणि सुव्यवस्था याच्या नावाखाली अशी थेर काय कामाची.. मुळात कायदा आणि सुव्यवस्था आहे का?? पोलीस दलात तेढ.. अजून नुकसान भरपाई दिलेली नाही.. देशात दुष्काळ माजला आहे त्याचे काहीही नाही.. आणि कसाब हा आतंकवादी आहे हे सर्व जग जाणते त्याला अजुन जिवंत ठेऊन निव्वळ पेसा खर्च करण्यात काय अर्थ आहे ?? त्याला संरक्षण कशापासून देत आहोत.. हेमंत करकरेंना चांगले बुलेटप्रुफ ज्याकेट नाही देऊ शकलेत आणि ह्या दक्कराला बंकर.. हा कुठला न्याय आहे.. सर्व जग आपल्यावर हसत आहे.. आणि आपले राजकारणी आणि होपलेस न्याय व्यवस्था जोवर सुधारत नाही तोवर काहीही होणार नाही..

Comments

Popular posts from this blog

थोडक्यात १४/१२/२००९

अवधूतची फरफट सुरूच...'झेंडा'ची डीव्हीडी पाठवली नारायण राणेंकडे!

वरळी सी फेस सुसाट गाडी चालवणार्यांना शिक्षा झालीच पाहिजे