करकरे यांच्या बुलेट प्रुफ जाकीटाचा घोळ
हे लोकसत्ता मधले सदर वाचले वाचले आणि सुन्न झालो.. http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=27860:2009-11-29-20-41-38&catid=73:mahatwachya-baatmyaa&Itemid=104 हे जर खरे असले तर मात्र आपली यंत्रणा पूर्ण संपलेली आहे.. जर ३ अति वरिष्ट अधिकारी फक्त बुलेट प्रुफ जाकीट च्या खरेदी साठी अमेरिकेपर्यंत जाऊन निकृष्ट जाकिटे विकत घेत असतील तर या देशाचे खरच कठीण आहे.. म्हणजे मिळणाऱ्या लाचेपोटी आपल्याच सहकाराचा जीव धोक्यात टाकायचा.. आणि सरकार तरी का चाल ढकल करत आहे या बाबत.. सरकार मधल्या काही हलकट लोकांचे तर काही संबंध गुंतले नाही न यात.. करकरे यांचे जाकीट गहाळ झाले.. ती फाईल गहाळ झाली.. हि काय करणे आहेत कि काय.. करकरे यांच्या जिवाला धोका असल्याची इंटिलिजन्स ब्युरोची माहिती असल्यामुळे करकरे यांना चंदेरी रंगाची खास बुलेटप्रूफ टाटा सिएरा गाडी (एमएच ०१ एसए १८८१) देण्यात आली होती. परंतु आश्चर्यकारकरीत्या २६/११ च्या हल्ल्याच्या आधी चार दिवस ही गाडी काढून घेण्यात आली होती. याचा अर्थ काय लावावा? मुश्रीफ यांनी लिहिले पुस्तक खरे म्हणावे कि काय? "हु किल्ड करकरे".. आपल्या कैगा अनु प्रकल्पात देखील घातपाताच्या बातम्या येत आहेत. म्हणजे पूर्ण यंत्रणा इतकी बेकार झाली आहे, भ्रष्टाचाराने इतकी गंजली आहे कि देशाच्या अति महत्वाच्या वस्तू देखील सुरक्षित नाहीत.. आणि म्हणे भारत महासत्ता होणार २०२० पर्यंत.. हे असले सरकार आणि हि system घेऊन काय महासत्ता होते कि काय?? बाबरी चे हे नवीन भूत सर्व राजकीय पक्ष चिघळून ठेवत आहेत.. कुण्या एका धर्माला दुखवावे लागू नये म्हणून सरकार लांगुल चालन करत आहे.. लोकप्रतिनिधी कुचकामी आहेत.. त्यांना स्वतःच्या तुंबड्या भरायची पडली आहे.. काश्मीर पासून केरला पर्यंत अस्वस्थता आहे.. माओ वादी आणि कडव्या विचारसरणीच्या संघटना बोकाळल्या आहेत.. कसा मार्ग काढणार यातून.. शेजारी देशांच्या कारवाया वाढत आहेत.. त्यांचा हस्तक्षेप आणि प्रभाव दोनीही वाढीला लागले आहे.. मग कसे आपण प्रत्येक भारतीयाच्या मनावर बिम्बवणार कि नाही रे बाबा भारत खरच सुरक्षित आहे.. ललित मोदी सारखे भिक्कारडे लोक IPL सामने दुसर्या देशात भरवतात आणि भारत सुरक्षित नाही हे कारण देऊन ?? आणि आपण आपल्या निवडणुकांच्या बरोबर हि एक सुरक्षा घेऊ शकत नाही?? ऑस्ट्रेलिया नंतर म्हणालेच ना कि भारताचा दौरा करणे आमच्या संघ साठी सुरक्षित नाही.. म्हणजे सर्व जगात आपण संदेश दिला की आमचा देश असुरक्षित आहे.. ह्या असल्या मोदी वर देशाच्या बदनामीचा खटला का चालवू नये ? कमीत कमी थोबडला तरी पाहिजेच.. निषेध करण्याच्या पलीकडे सामान्य माणसाच्या हातात काय आहे ? तो बिचारा सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत काम करत पळत असतो.. ह्या वाढत्या महागाई मध्य स्वतःचे आणि कुटुंबाचे पोट भरायचे असते त्याला.. वेळेवर कर नाही भरला तर आयकर खात्यापासून महानगरपालिका लगेच येतात थोबाड वर करून वसुलीला.. आणि जे लोक हि यंत्रणा राबवून घेतात त्यांचे मात्र पाय चेपतात.. वा रे न्याय !! आपले पु.ल. बरोबर म्हणाले होते.. "२ रुपयाची लाच खाली तर चौकड्याचा सादर घालून रत्नागिरी जेल मध्ये बसवतात आणि लाख रुपये खाल्ले की पाठवतात संसदेत लोकनियुक्त प्रतिनिधी म्हणून.."
Comments
Post a Comment