NRI ना मायदेशी परतण्याचे आवाहन - मनमोहन सिंग
२६/११ च्या दिवशी हि बातमी वाचून अचंबा वाटला...
मनात आले कशाला NRI भारतात कशाला परत येतील ? मरायला ??
२६/११ ला १६० लोक मेलेत त्यांना आपण फक्त श्रद्धांजली वाहतो.. शूरवीर हेमंत करकरे आणि साळसकर यांच्यासारखे पोलीस धारातीर्थी पडलेत..
हल्लेखोर कसाब मस्तपैकी बिर्याणी झोडतोय तुरुंगात.. आज वर त्याच्या ३१ कोटी रुपये सरकारने खर्च केलेत... त्याचे इतर हलकट मेलेले साथीदार करदात्यांच्या पैशांनी शवागारात आहेत..
कशा साठी ?? माहित नाही..
भारत काय सिद्ध करू इच्छितो याने ? माहित नाही..
या हलकट लोकांना कधी शिक्षा होणार का.. माहित नाही..
पोलिसांमध्येच सुसंगत co-ordination नाही त्यामुळे काही पोलीस हल्लेखोरांचा मुकाबला करण्यासाठी रस्त्यावर उतरलेच नाहीत.. याला काय म्हणावे?? कि देशावर हल्ला होतो आहे याची त्यांना अजिबात चाड नाही?? दावूद इब्राहीम सारख्या चे अजून आपल्या देशात जाळे आहे आणि ते कित्येक वेळा दहशतवादी हल्य्यांसाठी वापरले गेले आहे.. अजून ते का अस्तित्वात आहे ??
त्यातून हे राम मंदीर आणि बाबरीचे भूत परत मानगुटीवर बसले आहे.. प्रत्येक राजकारणी पक्ष त्याचे क्रेडीट घेण्यासाटी तरफडत आहे.. पण का ??
बाबरी पडली आणि तिथे मंदीर बांधले तर काय मोठा फरक पडणार आहे सामान्य लोकांच्या जीवनात.. उलट त्याने २ धर्मांमधली तेढच वाढेल..
उभी पिके पावसाने संपलीत.. शेतकरी आत्महत्या करतोय.. तूर आणि मुग डाळीचे भाव १०० रुपयांच्या वर जात आहेत.. घरांच्या किमती गगनापार गेल्यात.. गुंडगिरी वाढीला आहे.. तुंच्या घरासमोर आणि डोळ्यासमोर गुन्हे घडत आहेत पण तुम्ही काहीही करू शकत नाहीत (कारण तुम्हाला उद्याची चिंता आहे त्यांचा तो धंदाच आहे).. पोलीस निष्क्रिय आहेत.. राजकारणी फक्त स्वताच्या तुंबड्या भरत आहेत..
मग तुम्ही सांगा जर NRI भारतात येईल का ? अहो बाहेर देशात कितीही वर्णभेद असला तरी तो तुमच्या जीवावर बेतण्याची शक्यता ही खूप कमी आहे.. तुम्हाला तुमच्या कामाच्या जागी त्रास होऊ शकतो (बऱ्याच वेळा भारतीय लोकांमुळेच).. पण जीव तर नाही ना जात..
का यायचे NRI ने भारतात हे मी NRI झाल्याशिवाय नाही कळणार नाही..
Comments
Post a Comment