विचार - बलात्कार कसे थांबवावेत

रोज पेपर मध्ये कमीत कमी ३ बातम्या बलात्काराच्या असतात.. काहीतर इतक्या भयंकर असतात कि वाचून रक्त सळसळते आणि असे वाटते कि उठावे आणि सरळ ह्या बलात्कार्यांच्या डोक्यात दगड घालून त्यांना संपवावे.. कुणा निष्पाप व्यक्तीवर जबरदस्ती करायचा ह्या नालायक लोकांना काय अधिकार ?? आणि माहित असून देखील त्या मुलीचे किंवा बाई चे नातेवाईक काहीच का नाही करत.. किती संताप जनक आहे आहे हे सगळे.. "मतिमंद मुलीवर सामूहिक बलात्कारप्रकरणी चौघांना अटक" (http://epaper.esakal.com/esakal/20091125/5603600513670594021.htm) हे किती निघृण कृत्य आहे.. मला वाटते जर हे प्रकार थांबवायचे असतील तर एकाच उपाय.. बालात्कार्यांना सरळ २ गोळ्या घालाव्यात.. खरे तर हि खूपच सौम्य शिक्षा आहे.. त्यांना मरे पर्यंत मारले पाहिजे.. त्याशिवाय हे थांबणारच नाही.. कारण ह्या गुन्ह्याला काही शिक्षाच असू शकत नाही.. सक्तमजुरी आणि कैद हि काही यावर शिक्षा नव्हे.. एका निष्पाप जीवाचे आयुष्य बरबाद करण्याला कैद !! आपली महान न्याय व्यवस्था असे गुन्हे गभीर पणे कधी बघणार? सदोष मनुष्यावधा इतकाच बलात्कार देखील गंभीर आहे.. जळगाव, मिरज सेक्स कांड मधल्या आरोपींना कधी शिक्षा होईल ?? कधीच नाही.. कारण आपली न्याय व्यवस्था इतकी कुचकामी आहे की ते आरोपी काही ना काही करणे काढून बाहेरच राहतील..
मला वाटते कि काही समंजस लोकांनी पुढाकार घेऊन हि घाण संपवायला हवी.. हे देखील एक समाज कार्यच आहे..

Comments

Popular posts from this blog

थोडक्यात १४/१२/२००९

अवधूतची फरफट सुरूच...'झेंडा'ची डीव्हीडी पाठवली नारायण राणेंकडे!

वरळी सी फेस सुसाट गाडी चालवणार्यांना शिक्षा झालीच पाहिजे