सत्याची हत्या

काही हलकट नराधमांनी सतीश शेट्टी या अन्यायाला वाचा फोडणाऱ्या कार्यकर्त्याची हत्या केली आहे.. ही केवळ हत्या नसून भारताच्या सद्यस्थितीचे प्रतिबिंब आहे..
जो माणूस अन्याय आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात उभा राहतो त्याचा असा शेवट होणे हे केवळ आपल्या "सुव्यवास्थे" अधपतन आहे.. आणि जर शासनाने यावर काहीही हालचाल केली नाहीतर यामध्ये शासन आणि शिपुरद्यान्चा (शिपुरडे म्हणजे पोलीस) देखील हात आहे हेच सिद्ध होते.. अजून किती दिवस हे चालणार ?
बिल्डर्स, नगरसेवक, शासकीय कर्मचारी, कदाचित पोलीस देखील उद्या दिवसाढवळ्या अन्याय करत फिरतील.. प्रदीप शर्माने ते दाखवून दिले आहेच..
जमिनीला आले भाव कि गैरव्यवहार चालू.. याची शेती त्याच्या नावावर आणि जमिनी हडप करणे आलेच ओघाने.. आणि त्याला झकास पैकी राजकीय आशीर्वाद हे तर उघडे गुपित आहे.
ह्यावर अंकुश कुणाचाही नाही.. मोकाट सुटलेले हे हव्यासी लोक त्यांच्या आड येणाऱ्या लोकांचा असा मारेकरी घालून जीव घेतात.. आणि अर्थात आपल्या न्यायालयाची न्यायदेवता आंधळी आहे... त्यामुळे उघड्या डोळ्याने काही नाही दिसत आणि न्यायचे दूत (न्यायाधीश आणि वकील) म्हणजे जे दाखवतात ते मान्य असते तिला.. आता वेळ आली आहे कि हे सगळे बदलावे लागेल.. मोठे मोठे वकील भरमसाट फीस घेऊन काय वाट्टेल ते न्यायाचे चमत्कार करून दाखवतात आणि समान्य माणूस पैसे नसले कि कोर्ट कचेरीच्या फेऱ्यात अडकतो..

आपल्या स्वतंत्र भारतात सतीश शेट्टी हे एकाच उदाहरण नसून हजारो आहेत.. उ.दा. सत्यनारायण दुबे.. एका IIT इंगीनीरचा खून झाला होता.. पुढे काय झाले काहीच नाही.. आणि दुर्दैवाने सतीश शेट्टी यांच्या बाबतीत पण असेच होणार.. लोक २ मिनिटे हालहाल व्यक्त करणार आणि काही दिवसांनी विसरून जाणार.. लोकांनी कायदा हातात घ्यायची वेळ आली आहे..

आता बघू आपले सरकार कसे या घटनेला प्रतिसाद देते.. अर्थात ज्या षंढ कुत्र्यांनी कसाब सारख्याला अजून जिवंत ठेवले आहे त्यांच्या कडून फारशी अपेक्षा नाही.

Comments

  1. सरकार कडून अपेक्षा ठेवणेही चुकीचे आहे. सरकार हे स्वार्थी आहे सरकारकडून अपेक्षा ठेवणे म्हणजे आपणच आपल्या थोबाडात मारून घेणे होणार आहे.
    aakarshanblog.blogspot.com

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडक्यात १४/१२/२००९

अवधूतची फरफट सुरूच...'झेंडा'ची डीव्हीडी पाठवली नारायण राणेंकडे!

वरळी सी फेस सुसाट गाडी चालवणार्यांना शिक्षा झालीच पाहिजे