अमरसिंहांचा राजीनामा नामंजूर - मुलायम

नौटंकी !! केवळ नाटक !! मी मारल्या सारखे करतो तू रडल्यासारखे कर.. काहीही कर पण प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी जोकर अमरसिंग आणि मुलायम काहीपण करतात..
--------------
माध्यमांचे वार्तांकन चुकीचे - थरूर
थरूर यांनी सार्वजनिक बैठकांना जाण्याच्या आधी तंबाखू खावी म्हणजे तोंड बंद तरी राहील..

--------------------------------------------------

द्रुतगती मार्गावर कुंपण तोडून रस्ते!

म्हणजे असले धंदे करायचे आणि काही अपघात झाला कि रास्ता रोको करायचा.. काय मूर्ख लोक आहेत आपले.. म्हणजे स्वतः नीट राहायचे नाही आणि जर सरकारने चांगली सोय केली तर त्याची वात लावायची आणि परत भणंग रहायचे.. लायकीच हि ह्यांची...

---------------------------------------------------------

गावितांची बँकेत अफरातफर?

परत हे भिकार राजकारणी ह्यांच्याच बँकेत गैरव्यवहार करतात आणि सामान्य लोकांच्या ठेवी बुडवतात.. असल्या केस मध्ये लोकांनी जर असल्या हलकट लोकांना धरून मारले तर मजा येईल..

--------------------------------------------
भररस्त्यात इन्स्पेक्टरची हत्या
आरोग्यमंत्री एम. आर. के पन्नीरसेल्वम आणि क्रीडा व पर्यावरणमंत्री थिरू टी. पी. एम. मोहिदीन खान यांच्या सुरक्षेसाठी नियुक्त केलेल्या आर. वेत्रीवेल (४४) या पोलीस उपनिरीक्षकावर काही गुंडांनी भररस्त्यात मंत्र्यांच्या उपस्थितीत गावठी बॉम्ब टाकून हल्ला केला. आता हि बातमी ऐकून हसायचे की वाईट वाटून घ्यायचे तेच काळात नाही.. आणि हल्ला होऊन देखील हे मंत्री थांबले पण नाहीत म्हणजे त्यांना त्यांच्याच सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांच्या जीवाची काहीही काळजी नाही.. हे असले मंत्री म्हणे देशाची सुरक्षा करणार.. डोम्बल.. अरे जा रे लोकांनो पळून ऑस्ट्रेलिया मध्ये तिथे लाखात एक मरतो आणि मारणार्यांना शिक्षा तरी होते.. इथे तोंड दाबून बुक्क्यांचा मार नुसता..

Comments

Popular posts from this blog

थोडक्यात १४/१२/२००९

अवधूतची फरफट सुरूच...'झेंडा'ची डीव्हीडी पाठवली नारायण राणेंकडे!

वरळी सी फेस सुसाट गाडी चालवणार्यांना शिक्षा झालीच पाहिजे