गारुडी गोंधळ !!

"भाषा आणि धर्माच्या मुद्यावर जनतेमध्ये फूट पाडणं शिवसेनेला कधीच मान्य नव्हतं, नाही"
हे शिव सेनेच्या जोशी सरांनी म्हटलेले वाक्य जरा गोंधळात टाकणारे आहे नाही ?
शिव सेने चे असे म्हणणे आहे की म.न.से. ने त्यांचा मराठी भाषेचा मुद्दा चोरला !! आणि शिव सेनेचे हिंदुत्व सर्वांनाच माहित आहे.. मग जात आणि भाषेच्या मुद्द्या वर जाणते मध्ये कोण फुट पाडत आहे ?
-----------------------------------------------------------------------------------------
'विदर्भ बंद/बंड' 'हिट', ऐन थंडीत वातावरण 'हॉट'

ट्रेन व्यवस्था आणि सर्व जनताभिमुख व्यवस्था बंद करायच्या आणि बंद यशस्वी झाल्याचा दावा करायचा.. जर विदर्भ होण्याच्या आधी हे असे तर विदर्भ झाल्यावर रोजच बंद करतील..
"बसेसवर दगडफेक झाली, पण बससेवा बंद झाल्यानंतर पुन्हा सारं सामसूम होऊन गेलं. " होणारच ना !! हि काय पद्धत आहे का बंद पुकारायची.. हे बंद पुकारणारे, बसेसवर दगडफेक करणारे आंदोलक आणि दंगलखोर सारखेच नाहीत का.. मग दंगलखोरांना जरा "दिसताक्षणी गोळ्या" घालायचा आदेश इथे ह्या हिंसक आंदोलकांना का देऊ नये अथवा दिला नाही ?

"गोंदिया - वाहतूक, शाळा, महाविद्यालये बंद"
"गडचिरोली - वाहतूक बंद, जनजीवन विस्कळीत"
"चंद्रपूर - युवक व दांपत्याचे 'टॉवर' आंदोलन"

छान..

करा करा वेगळा विदर्भ करा .. केंद्र कडून दर वर्षी मदतीची भिक मागत राहा आणि आलेले पैसे खात राहा.. विकास शून्य.. आजवर
----------------------------------------------------------------------------------------------------

'अभिमता'ची पश्‍चातबुद्धी

ही असली विद्यापीठे कधीच बंद करायला हवी होती.. ह्या विद्यापीठांच्या फिया इतक्या जास्त का आहेत त्याचा देखील शोध घेतला पाहिजे..
कुठल्याही प्रवेश प्रक्रियेत CET गरजेची करायला हवी होती.. अभिमत दर्जा एकदा झाला की मनमानी कारभार चालू होतो.. हे सरकार च्या लक्षात यायला हवे होते आत्तापर्यंत..
महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त शिक्षण संस्था आहेत पण त्यांचा सामान्य लोकांना ज्ञानासाठी किती उपयोग होतो आणि किती जाच हे पण पडताळले तर बरे होईल..
बऱ्याच संस्था ह्या राजकीय कुत्र्यांच्या असल्याने त्यांच्या आशीर्वादाने सगळे काही आल वेल चालू आहे...
अभिमत विद्यापीठांची मान्यता काढून घेण्याचा केंद्र सरकारचा निर्णयाला जर ह्या विद्यापीठांच्या मालकांनी जर न्यायालयात आवाहन नाही दिले तरच नवल.. मला नक्की माहित आहे कि आपणा सर्व लोकांचा न्यायालयावर किती विश्वास आहे...

Comments

Popular posts from this blog

थोडक्यात १४/१२/२००९

अवधूतची फरफट सुरूच...'झेंडा'ची डीव्हीडी पाठवली नारायण राणेंकडे!

वरळी सी फेस सुसाट गाडी चालवणार्यांना शिक्षा झालीच पाहिजे