म्हणे शेतकरी सावरला पाहिजे - शरद पवार

शेतकरी सावरला पाहिजे - शरद पवार

पेरायला बियाणे नकली
खते नकली
द्यायला पाणी नाही
पाणी आहे तर वीज नाही
सगळे आहे तर मालाला भाव नाही
कर्ज मिळत नाही.. तिथे नोकरशहा त्रास देतो..
अडत दुकानदार आणि दलाल सर्रास लुटतात
नद्यांवर बांध नाहीत, बांध घातले कि फोडतात
पाण्याची पातळी कमी होतेय
आणि एखाद्या वर्षी सगळे जुळून आले की निसर्ग आपली कळा दाखवतो.. अवकाळी पाऊस
दिवसभर शेतात काबाडकष्ट करून काम केल्यापेक्षा शेतकरी म्हणतात कि हापिसात प्यून लागले तरी चालेल.

साहेब कसा सावरणार शेतकरी ? उगाच आपले काहीतरी बोलू नका.. काही करा...

------------------------------------------------------------------------

कोठडीत गुंडांकडून धोक्याचा प्रदीप शर्माचा दावा

वा !! म्हणजे प्रदीप शर्मा ने हजारो कोटी गुंडांकडून कमावले.. अर्थात गुंड संपवले ही चांगली बाब.. पण म्हणजे पोलिसांसाठी कामा न करता गुंडांच्या टोळ्यांसाठी काम केले.. जर त्या टोळ्यांनी नसते दिले पैसे तर इतक्या तत्परतेने संपवले असते का हे गुंड ??

असंगाशी संग प्राणाशी गाठ

-------------------------------------------------------------

ऍन्टॉप हिल येथे पोलिसाला मारहाण

घ्या !! आता पोलिसाचा धाक इतका कमी झाला आहे की साधे गल्ली गुंड पण मारतात त्यांना..
----------------------------------------------------------------------------

महापौर निघाल्या प्लॅस्टिक पिशव्यांच्या शोधात

हा पब्लिसिटी स्टंट आहे का ? वाजत गाजत गेल्यावर तो मारवाडी दुकानदार दाखवणार आहे का प्लास्टिक पिशव्या ?

--------------------------------------------------------------------------------------------

Gujarat rated number one state by Rajiv Gandhi Foundation
आहेच नंबर वन स्टेट.. तिथे वीज जात नाही अगदी खेड्यांमध्ये देखील, सुरत जगात नंबर एक आहे हिरयांसाठी.. अतिशय स्वच्छ शहर म्हणून सुरत आता ओळखले जाते..
नाहीतर महाराष्ट्र म्हणजे अंधार, सगळे उद्योग दुसरीकडे जात आहेत, राजकारणी कुत्री खुर्चीसाठी भांडत आहेत, वीज नाही, पाणी नाही, बकाल मुंबई, बकाल नागपूर.. आणि बकाल म्हणाले की शिवसेना मनसे म्हणणार कि हे परप्रांतीय लोंढे इकडे येतात म्हणून झाले..

अरे न बोलून काही तरी करा ना.. परप्रांतीय लोंढे तामिळनाडू आणि गुजरात मध्ये का नाही जात ? आणि तिथे गेले तरी तिथले सगळे आचार विचार उचलतात ना ? उगाच बोलून कशाला दाखवायचे.. शिवाजी महारांच्या नावाने धंदे करता जरा समर्थ रामदास वाचा एकदा. "कृतीवीण वाचाळता व्यर्थ आहे".. कसे होणार महाराष्ट्राचे देव जाणे..
---------------------------------------------------------------

Broken by red tape, retired teacher dies

आणि ३० वर्ष शिक्षक म्हणून नोकरी केल्यावर सरकार म्हणतेच कसे कि "the government refused to pay her pension on the ground that she did not have the requisite qualifications to be a teacher"
याला जबाबदार कोण ? नोकरशहा... असेच अनेक जीव हे नोकरशहा रोज घेत असतात.. चिरीमिरी साठी आपली स्वतःची आई बहिण पण गहाण ठेवतील हे लोक.
धन्य तो भारत आणि धन्य ते सरकार, धन्य ती लोकशाही

Comments

Popular posts from this blog

थोडक्यात १४/१२/२००९

अवधूतची फरफट सुरूच...'झेंडा'ची डीव्हीडी पाठवली नारायण राणेंकडे!

वरळी सी फेस सुसाट गाडी चालवणार्यांना शिक्षा झालीच पाहिजे