पीछेहाट !!!

सरकारचा मराठी 'गिअर रिव्हर्स'मधे
काय सरकार आहे कि गमजा ? महाराष्ट्रात मराठी जरुरी नाही ? हा अशोक चव्हाण घरात नक्कीच तेलुगु बोलत असतील. कारण मंत्रिमंडळ स्थापन करायच्या वेळेस लवकर काहीतरी तोडगा काढण्यापेक्षा सत्य साई बाबांची पाद्यपूजा करत बसणे सर्वांनीच पाहिले..
" टॅक्सी परवान्यासाठी मराठी सक्तीचेः मुख्यमंत्री" असे कालचे विधान आज मागे ? माकडचाळे आहेत कि काय ? माकडे देखील लगेच कोलांट्या उड्या नाही घेत..
हा असला मुख्यमंत्री ज्याला राज्याभाषेची कदर नाही तो माणूस काय प्रगती करणार, डोम्बल ?? आणि बाकी मंत्री कुणीच विरोध नाही करत.. सगळे दिलेली "खाती" भोगत बसलेत..
लाज वाटत आहे की नंबर एक असलेले राज्य असल्या ढिसाळ नेतृत्वामुळे घसरत चालले आहे.. एकाहून एक सरीसृप मुख्यमंत्री लाभलेत विलासराव देशमुख, अशोक चव्हाण..
आता सर्वांनाच तमिळ नाहीतर तेलुगु, कन्नड शिकावी लागणार असे दिसते.. महाराष्ट्रात काही राहिले नाही ..
वीज नाही पाणी नाही संधी नाही नुसती रेड टेप..
-------------------------------------------------------------------------------------------

मंडई बांधली; पण रस्ताच नाही

हि तर पुनायची सद्यस्थिती आहे.. रस्ते नाही आणि आहेत ते भिकार अवस्थेत.. कंत्राटी कामामध्ये भयंकर लाचखोरी.. त्यामुळे निकृष्ट दर्जाचे रस्ते तयार होणार आणि पहिल्या पावसात वाहून जाणार..

---------------------------------------------------------

स्वतंत्र विदर्भवाद्यांशी दोन हात करू

कराच तुम्ही आता दोन हात.. ज्या मागणीसाठी तिथले नेते नक्षलवाद्यांची मदत घेण्याची भाषा करतात आणि आपले सरकार त्याच्याकडे दुर्लक्ष करते असल्या लोकांना धडा कुणीतरी शिकवलाच पाहिजे.. आणि जर सरकार काही करू शकत नसेल तर कुणीतरी हि घाण साफ करायलाच हवी..

Comments

Popular posts from this blog

थोडक्यात १४/१२/२००९

अवधूतची फरफट सुरूच...'झेंडा'ची डीव्हीडी पाठवली नारायण राणेंकडे!

वरळी सी फेस सुसाट गाडी चालवणार्यांना शिक्षा झालीच पाहिजे