...तर 'स्वाभिमान'वाले 'झेंडा' रोखणार आणि इतर

"...तर 'स्वाभिमान'वाले 'झेंडा' रोखणार"
याला म्हणतात "मान या ना मान मी तेरा मेहमान" किंवा "संडास मालकाचा आणि रुबाब साफ करणार्याचा".. काही संबंध आहे का नितीश राणे (नारोबा राणेंचे सुपुत्र हीच त्यांची ओळख) याच्याशी !! आत्ताच पाणी मोर्चा काढून थोबाड रंगवून घेतले माणिकराव ठाकरेंकडून तरी अक्कल नाही आली..
म्हणजे स्वाभिमान संघटना व्य्क्तीपुजक आहे.. त्याचा "स्वाभिमान" शी काहीही संबंध नाही ?
शेतकऱ्यांसाठी आणि पाण्यासाठी आंदोलने केल्यापेक्षा काही तरी विधायक कामे केली तर कुणी ऐकेल तरी.. उगाच गोंधळ करून सवंग प्रसिद्धी मिळवायचा अट्टाहास का ?

--------------------------------------------------------

सुरिंदर कोलीच्या मृत्यूदंडाला स्थगिती

घ्या !! आपल्या "न्याय"व्यवस्थेचे उत्तम उदाहरण. होपलेस लेकाचे !!

----------------------------------------------------------------------

अमरसिंह यांनी सोडली 'सप'ची तिन्ही पदे

आता हे सर्व राजकारण पण दे सोडून म्हणावे.. उगाच जोकरगिरी करून प्रसिद्धीच्या झोतात तरी नाही दिसणार. उथळ वक्तव्यांमुळे टीवी वाल्यांच्या नुय्ज गेल्यात यापलीकडे अमरसिंग ने राजीनामा दिला काय किंवा आणि नाही काय काहीही फरक नाही पडत.. घोडाबाजार थोडा अवघड जाईल इतकेच.. UP मधले लोक तसेच आयुष्य जगतील, लोकांच्या सुरक्षा व्यवस्थेत आणि आयुष्यात काहीही सुधार होणार नाही, अमरसिंग आणि कंपनी लोकांना लुबाडतच राहणार..
किडनीची शस्त्रक्रिया झाली आता एकदा डोके पण तपासून घ्यायला हरकत नाही अमरसिंग ने :)
अमर सिहांसारखा उथळ राजकारणी भारतीय राजकारणाला पुन्हा न मिळो, हीच देवाकडे प्रार्थना.

--------------------------------------------------------------

कसाबच्या डोससाठी भाई

"ताप व उलट्यांमुळे आजारी असलेल्या कसाबवर सध्या उपचार सुरू आहेत".. वा वा असेच चालू द्यात.. त्याची व्यवस्था नीट ठेवली आहे ना अशोक राव नाहीतर तुमचे भावी जावई अजमल कसाब तुरुंगातच आजाराने मरतील बरा का ?
आणि तुमच्या मध्ये आणि शशी थरूर मध्ये कसाब ला जावी करून घेण्यास चांगलीच चुरस आहे बरा का..
इतर ठिकाणी जनाधाराचे कौतुक आणि कसाबच्या बाबतीत मात्र काही जनाधार नाही ? हा खासा न्याय बुवा तुमचा..
आत्ताच परवा तुम्ही म्हणाला होतात कि "मानकर आरोपी आहे दोषी नाही" हा न्याय कसाब ला पण लावणार का..
राजकारणी आणि गांडूळ यांची जात मात्र एक.. दुतोंडे..

Comments

Popular posts from this blog

थोडक्यात १४/१२/२००९

अवधूतची फरफट सुरूच...'झेंडा'ची डीव्हीडी पाठवली नारायण राणेंकडे!

वरळी सी फेस सुसाट गाडी चालवणार्यांना शिक्षा झालीच पाहिजे