दूरदर्शी ग.दि.माडगूळकर

भारताची सध्यस्थिती आणि काही दशकापूर्वी लिहिलेली गदिमांनी हि कविता केवळ गदिमांचा दूरदर्शीपणा दाखवते.. राजकीय लाभासाठी देश विकायला काढणाऱ्या चिंधीचोर राजकारण्यांनी हि कविता जरूर वाचावी..

ज्या देशात अंधश्रद्धा अमाप असतात, पण धर्म असा एकही असत नाही
त्या देशाची दशा दयनीय असते.
जो देश स्वतः न कातलेली वस्त्रे अंगावर धारण करतो
स्वतः न पिकवलेल्या धान्याची भाकर खाऊन पोट भरतो
त्या देशाची दशा दयनीय असते.
अंत्ययात्रेची वाटचाल चालताना ज्यांच्या ओठांना वाचा फुटते
भूतकालीन भग्नावशेषच ज्यांच्या अभिमानाचे विषय होतात
त्यांच्या देशाची दशा दयनीय असते.
वधस्थलावरला ओंडका व मारेकर्‍याची कुर्‍हाड यांच्या कचाट्यात
कंठ आल्यावर ज्यांना बंडाचा उठाव आठवतो
त्यांच्या देशाची दशा दयनीय असते.
जेत्याचे स्वागत ज्या देशात तुतार्‍यांच्या ललकारीने होते अन्
पदच्युतांची पाठवणी हेटाळण्यांच्या आरोळ्यांनी केली जाते,
पण ती कशासाठी ? तर नव्या सत्ताधार्‍यांचे स्वागत पुन्हा तुतार्‍यांनी करण्यासाठीच
म्हणूनच त्या देशाची दशा दयनीय असते.
ज्या देशातले ऋषीमुनी वर्षानुवर्षे मौन राखतात अन्
पराक्रमी पुरूष पाळण्यात पडून मुठी चोखत असतात
त्या देशाची दशा दयनीय असते.
ज्या देशाच्या एकसंधतेचे एवढे एवढे तुकडे होतात अन्
प्रत्येक तुकड्यावरचे प्रजाजन स्वतःला स्वतंत्र राष्ट्रच मानतात
त्या देशाची दशा दयनीय असते.

Comments

Popular posts from this blog

थोडक्यात १४/१२/२००९

अवधूतची फरफट सुरूच...'झेंडा'ची डीव्हीडी पाठवली नारायण राणेंकडे!

वरळी सी फेस सुसाट गाडी चालवणार्यांना शिक्षा झालीच पाहिजे