अतिरेक !!

आधी सोनियांशी मराठीत बोला - उद्धव ठाकरे

http://72.78.249.124/esakal/20100124/5457067059577067361.htm

या बातमीवर काय बोलावे.. मराठीचा अभिमान सर्वांनाच आहे पण त्याच प्रदर्शन आणि नको तिथे insistence काही बरोबर वाटत नाही.. उगाच त्यामुळे मराठी बाबतीत गैरसमज होऊ शकतो.. जर सोनिया गांधींबरोबर काही बोलायचे असले तर सामायिक भाषा (हिंदी) असताना दुभाषे घेऊन मराठीत का बोलायचे..
हा मात्र अतिरेक आहे..

अर्थात इतकी साधी प्रतिक्रिया सकाळ च्या मुर्खांनी छापली नाही म्हणून इथे ...

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
शेतकरी हितासाठी घरी जाण्याची तयारी

http://72.78.249.124/esakal/20100124/4900629333442591628.htm


अहो साहेब २ दिवसात तुमी काय काय विधाने केलीत ? नुसते भाषणात बळीराजा आणि प्रत्यक्षात काहीही नाही.. कशाला उगाच लोकांना भुलवता.. शेतकरी राबतो आणि धान्य दलालाला विकतो आणि तो दलाल सर्व किमती ठरवतो.. तोच मुळात हरामखोर आहे.. आणि सरकार आणि इतर बाजार बुणगे त्याला पाठींबा देतात.. शेतकरी सहकार संघटना फक्त कागदावर.. का करेल हो कुणी शेती ?

पाणी आहे तर वीज नाही आणि वीज आहे तर पाणी नाही.. जल संवर्धन कागदावर.. पाण्याची पातळी जातीय खाली खाली.. १८ तास लोड शेडींग आहे आमच्या इथे.. कधी देऊ पाणी तुम्ही सांगा.. आणि का करू शेती ते देखील सांगा..

वल्गना नुसत्या..

------------------------------------------------------------------------------------------------------------------------
बाळासाहेबांना बर्थ डे गिफ्ट
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5491797.cms

हे मात्र झकास झाले.. आता त्या अबू आझमी नावाच्या विषवल्ली ला इथून कायमचे हाकलून द्या. सगळे त्याचे गैर धंदे बंद करावेत.. इथे राहतो आणि १२५ कोटी ची मालमत्ता कमावतो आणि इथेच हागतो ?
मी शिव सेना अथवा मनसे चा अथवा कुठल्याच राजकीय पक्षाचा माणूस नाही पण ही बातमी वाचून बरे वाटले..

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लाखांदूर, पवनी तहानलेलेच

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5494863.cms

हि स्थिती सर्व महाराष्ट्रात आहे . मूर्ख लोक कारभार करत आहेत न पाटबंधारे विभागाचा .."३०० मिटर खोदूनही जमिनीखाली पाणी लागत नाही" म्हणजे बघा.. काय हाल आहेत.. हे काय चालू आहे ? कसे जगणार शेतकरी आणि म्हणे भारत हा शेतीप्रधान देश आहे.. डोम्बल.. अर्थात ताली एका हाताने नाही वाजत.. बंधारा टाकला तर चोर त्याचे पत्रे नेतात चोरून.. आणि सिमेंट चा टाकला तर फोडतात.. मला असे वाटते कि शेत तळे हा चांगला उपाय होऊ शकतो.. पण मग तेवढा भाग वाया जातो ना. पिक येत नाही त्यात..
अर्थात ज्याचा त्याचा प्रश्न.. दूरच्या फायद्यासाठी थोडा तोटा सहन करावा लागेलच..

Comments

  1. True. Sonia Gandhi learnt Hindi. She is not from Maharashtara nor does she reside there. So to demand to speak in marathi with her is a baseless idea. It should be hindi when communication with her. I instead wish PC is asked learn hindi.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडक्यात १४/१२/२००९

अवधूतची फरफट सुरूच...'झेंडा'ची डीव्हीडी पाठवली नारायण राणेंकडे!

वरळी सी फेस सुसाट गाडी चालवणार्यांना शिक्षा झालीच पाहिजे