अवधूतची फरफट सुरूच...'झेंडा'ची डीव्हीडी पाठवली नारायण राणेंकडे!

अरेरे !! एका नवोदित निर्मात्याला इतका त्रास देणे हे नारोबा राणेला शोभते का? नक्की मुद्दा काय आहे तेच नाही काळात..
जर त्याच्यासारखे असले पात्र तर काय बिघडले ? शेवटी चित्रपट हा मनोरंजनासाठी आहे ना !! आणि खर्या आयुष्यात नारायण राणे काय ग्रेट माणूस आहे कि काय ? ह्या महात्म्याची सत्ता लालसा सगळ्यांना ठाऊक आहे..
अवधूत गुप्ते ना बेस्ट लक.. मित्र तुझा जन्म भारतात झाला आहे आणि मूर्ख राजकारणी लोकांच्या जीवनावर (?) तू चित्रपट काढत आहेस हीच तुझी चूक आहे..
तू तुझा फायदा नुकसान काय होते ते बघ आणि अशोक चव्हाण यांच्या आवाहनाला दाद देऊन तू तक्रार कर.. भलेही अशोक चव्हाण त्याचा राजकीय लाभ उठवतील पण राणे सारख्या विघ्नसंतोषी माणसाला धडा तर मिळेल.. त्यानंतर मात्र तुला आयुष्यभर राणे टोळीपासून धोका उद्भवू शकतो.. पण याला काहीही इलाज नाही कारण नितेश राणे आणि त्याचे पूज्य पिताश्री यांच्यासारख्यांनी पूर्ण भारत बरबटला आहे..

Comments

  1. आता सदा मालवणकराचे पात्र म्हणजे म्हणजे प्रत्यक्षात काही धुतल्या तांदळाचे उदाहरण नाही की ज्याला चित्रपटात वाईट दाखवलं गेलय. जर तुम्हाला आपली चित्रपटात दाखवण्यात आलेली प्रतिमा बघायला आवडत नसेल तर प्रदर्शन रोखाण्यापेक्षा आपली प्रतिमा बदला. मोठे आले स्वाभिमानी.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडक्यात १४/१२/२००९

वरळी सी फेस सुसाट गाडी चालवणार्यांना शिक्षा झालीच पाहिजे