Posts

Showing posts from 2010

एटीएम फोडणाऱ्या दोघांना अटक

एटीएम फोडणाऱ्या दोघांना अटक पुन्हा उत्तर प्रदेश चे लोक असे धंदे करताना पकडले.. उगाच नाही UP अणि बिहार च्या लोकांना महाराष्ट्र अणि इतर राज्ये शिव्व्य देत..

काय मजा चालू आहे नाही महाराष्ट्रात

काय मजा चालू आहे नाही महाराष्ट्रात ... इतक्या समस्या असताना आपले सर्कार शाहरुख़ खान, मराठी अमराठी वाद आणि IPL सामने यांच्याकडे अगदी जातीने लक्ष पुरवत आहे.. म्हणजे  महागाई, बेरोजगारी, पाणी समस्या, लोडशेडिंग, बाल मजुरी, कन्या भ्रुण हत्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कर्जबाजारी महाराष्ट्र, अधिवासी वसलेली अंधश्रद्धा, कुपोषण, खराब रस्ते, शिक्षणात वाढणाऱ्या आत्महत्या, सहकार साखर घोटाळे, सहकार बँक घोटाळे या बद्दल या राजकारणी कुत्र्यांना काहीही देणे घेणे नाही.. फक्त काहीतरी फालतू बकबक करून भिक्कार मीडिया च्या जोतात रहायचे..  अरेरे उगाच नाही गुजरात नंबर एक चे राज्य होते आहे.. 

महान पिता विलासराव देशमुख

बघा बघा कुत्र कसे पीठ खाते आहे.. हा लेख जरूर वाचा  http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=46419:2010-02-08-19-01-08&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid= २ म्हणजे विलास देखमुख फक्त त्याच्या मुलांच्या कंपन्यांसाठी काम करत आहे. एकीकडे इंडियाबुल्स ला टेंडर्स मिळवून द्यायचीत आणि आता सद्या अवजड उद्योगमंत्री असल्याने धान्यापासून दारू निर्माण करायचे कारखान्यांचे परवाने दुसर्या पोराला मिळवून द्यायचे.. नुसते हे नव्हे तर "खराब" ज्वारी व्यापार्यांकडून विकत घेऊन हे धंदे करायचे.. जर ज्वारी खराबच घायची होती तर मग सरकारकडून घ्यायची होती ना किंवा ११.५ रुपये किलोने शेतकर्यांनी पण विकली असती कि खराब ज्वारी... पण मग व्यापार्यांकडून विकत घेतली म्हणजे परत बाजारात त्याचा साठ नसल्याने भाव वाढणार..  आणि नुसते हेच नाही तर त्या कारखान्यांना अनुदाने पण मिळवून द्यायची.. वा रे वा.. म्हणजे नुसती चोरी नाही तर सरकारी चोरी पण.. आणि हे अल्कोहोल खरच औद्योगिक आहे कि औद्योगिक प्रमाणावर अल्कोहोल बनवणे चालू आहे ? आणि तिसरा मुलगा रितेश देशमुख ला राम गोपाल ...
उत्तर प्रदेशातील व्यक्तीकडून साडेतीन किलो चरस जप्त   ऍडमिशन' मिळवून देणाऱ्या दोन बिहारी तरुणांना अटक   म्हणून या मुर्खांचा राग येतो.. इथे येउन घाण करतात..  स्वतःच्या राज्यांची अशीच वाट लावली आता बाकी ठिकाणची वाट लावत आहेत.

शिवसेनेच्या विजयात कॉंग्रेसचा 'हात' - आझमी

काय गम्मत आहे नाही.. हा फरहान आझमी त्याच्या तीर्थरुपांच्या कर्माचे फळ म्हणून पडला.. आणि अबू आझमी आमदारांकडून मुस्काटात खाऊन पण आपली टांग वर करणार ती करणारच.. अर्थात इतकी साधी प्रतिक्रिया सकाळच्या छक्क्यांनी छापली नाही म्हणून इथे..

अतिरेक !!

आधी सोनियांशी मराठीत बोला - उद्धव ठाकरे http://72.78.249.124/esakal/20100124/5457067059577067361.htm या बातमीवर काय बोलावे.. मराठीचा अभिमान सर्वांनाच आहे पण त्याच प्रदर्शन आणि नको तिथे insistence काही बरोबर वाटत नाही.. उगाच त्यामुळे मराठी बाबतीत गैरसमज होऊ शकतो.. जर सोनिया गांधींबरोबर काही बोलायचे असले तर सामायिक भाषा (हिंदी) असताना दुभाषे घेऊन मराठीत का बोलायचे.. हा मात्र अतिरेक आहे.. अर्थात इतकी साधी प्रतिक्रिया सकाळ च्या मुर्खांनी छापली नाही म्हणून इथे ... ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- शेतकरी हितासाठी घरी जाण्याची तयारी http://72.78.249.124/esakal/20100124/4900629333442591628.htm अहो साहेब २ दिवसात तुमी काय काय विधाने केलीत ? नुसते भाषणात बळीराजा आणि प्रत्यक्षात काहीही नाही.. कशाला उगाच लोकांना भुलवता.. शेतकरी राबतो आणि धान्य दलालाला विकतो आणि तो दलाल सर्व किमती ठरवतो.. तोच मुळात हरामखोर आहे.. आणि सरकार आणि इतर बाजार बुणगे त्याला पाठींबा देतात.. शेतकरी सहकार ...

अरेरे सकाळ

Image
पुन्हा दबाव आणला तर तशीच कबुली - कसाब या बातमी वर ची सकाळ ने approve केलेली प्रतिक्रिया बघा.. निर्लज्ज सकाळ वाले काय दारू पिऊन बसले होते काय असल्या प्रतिक्रिया approve करायला ? आणि बर्याच वेळा शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या बाताम्यान्वरच्या प्रतिक्रियाच नाही छापत.. सकाळ हे वृत्तपत्र सकाळी शौचालयात वाचून तिथेच टाकून द्यावे... -------------------------------------------------------------------------- ‘आयपीएल’ची अस्पृश्यता! हा अग्रलेख आहे... आणि मला एक कळले नाही पाकिस्तान रोजच्या रोज आपल्यावर तांगडे वर करून लघु शंका करत आहे आणि लोकसत्ता च्या मूर्खांना कसला आला आहे त्यांचा पुळका.. मूर्ख लेकाचे.. ----------------------------------------------------------------------------- भारतात पुन्हा २६/११ होणार नाही याची हमी पाकिस्तान देऊ शकत नाही- गिलानी आपण त्यांची डुक्करे (कसाब आणि दाउद ची अंडी पिल्ली ) पोसत आहोत आणि हे कुत्तरडे रोज तंगडे वर करून मुतत आहे... आणि केवळ भारतीयांनाच नव्हे तर हरामखोर पाकांड्याना पण आपल्या न्याय व्यवस्थेवर किती विश्वास आहे हेच दिसून येते.. त्या कसाब ला आत्ता पर्यंत फाशी दिली...

TAXI PERMIT कायदा काय म्हणतो ?

कायदा म्हणतो महाराष्ट्र मोटार वाहन नियम -२४ लोकसेवा वाहन चालविणाऱ्या चालकांचे अधिकारपत्र:- (१) मोटार कॅब वगळता लोकसेवा वाहन चालविण्याचे अधिकारपत्र देण्यात आले आहे, अशा प्रत्येक व्यक्तीला एक धातूचा बिल्ला देण्यात येईल. त्यासाठी शर्त अशी असेल की, त्या व्यक्तीला ती ज्या भागात वाहन चालविणार आहे, त्या भागाची भौगोलिक माहिती असल्याबद्दल आणि मराठीचे व त्या भागात जास्त प्रमाणात बोलल्या जाणाऱ्या कोणत्याही भाषेचे कामचलाऊ ज्ञान असल्याबद्दल प्राधिकाऱ्याला खात्री पटवून दिली पाहिजे. शासनाचे स्पष्टीकरण टॅक्सीचालकांना परवाने देण्याच्या निर्णयाबाबत अधिवासाचा कालावधी व भाषेच्या अनुषंगाने राज्य मोटार वाहन नियम १९८९ च्या तरतुदींत कोणताही बदल केलेला नाही. महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ४ (२) आणि नियम २४ (१) नुसार महाराष्ट्रात टॅक्सी चालविण्यासाठी अधिकृत परवानगी प्राप्त करू इच्छिणाऱ्या अर्जदाराला ज्या क्षेत्रात तो टॅक्सी चालवू इच्छितो त्या क्षेत्राची माहिती असणे तसेच त्याला मराठीचे व्यावहारिक ज्ञान आणि त्या क्षेत्रात सर्वसामान्यपणे बोलल्या जाणाऱ्या भाषेचे ज्ञान आवश्यक असणे आवश्यक आहे. तसेच अशा ...

पीछेहाट !!!

सरकारचा मराठी 'गिअर रिव्हर्स'मधे काय सरकार आहे कि गमजा ? महाराष्ट्रात मराठी जरुरी नाही ? हा अशोक चव्हाण घरात नक्कीच तेलुगु बोलत असतील. कारण मंत्रिमंडळ स्थापन करायच्या वेळेस लवकर काहीतरी तोडगा काढण्यापेक्षा सत्य साई बाबांची पाद्यपूजा करत बसणे सर्वांनीच पाहिले.. " टॅक्सी परवान्यासाठी मराठी सक्तीचेः मुख्यमंत्री" असे कालचे विधान आज मागे ? माकडचाळे आहेत कि काय ? माकडे देखील लगेच कोलांट्या उड्या नाही घेत.. हा असला मुख्यमंत्री ज्याला राज्याभाषेची कदर नाही तो माणूस काय प्रगती करणार, डोम्बल ?? आणि बाकी मंत्री कुणीच विरोध नाही करत.. सगळे दिलेली "खाती" भोगत बसलेत.. लाज वाटत आहे की नंबर एक असलेले राज्य असल्या ढिसाळ नेतृत्वामुळे घसरत चालले आहे.. एकाहून एक सरीसृप मुख्यमंत्री लाभलेत विलासराव देशमुख, अशोक चव्हाण.. आता सर्वांनाच तमिळ नाहीतर तेलुगु, कन्नड शिकावी लागणार असे दिसते.. महाराष्ट्रात काही राहिले नाही .. वीज नाही पाणी नाही संधी नाही नुसती रेड टेप.. ------------------------------------------------------------------------------------------- मंडई बांधली; पण रस्ताच नाह...

जांबुवंतराव धोटे ची मुक्ताफळे

"एक अग्रणी नेते जांबुवंतराव धोटे यांनी दोनच दिवसांपूर्वी चंद्रपूर येथील एका बैठकीत वेळ पडल्यास आंदोलनासाठी नक्षलवाद्यांची मदत घेऊ".. या महाशयांना अतिरेकी विरोधी कारवाई कायद्याखाली अटक का करू नये ?? असली मुक्ताफळे उधळताना लाज देखील नाही वाटत.. अप्रत्यक्षरीत्या हे नक्षलवाद्यांना पाठींबा देण्यासारखेच झाले ना !! आपले माननीय आणि कुचकामी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यावर काहीच कसे नाही बोललेत ??

गारुडी गोंधळ !!

"भाषा आणि धर्माच्या मुद्यावर जनतेमध्ये फूट पाडणं शिवसेनेला कधीच मान्य नव्हतं, नाही" हे शिव सेनेच्या जोशी सरांनी म्हटलेले वाक्य जरा गोंधळात टाकणारे आहे नाही ? शिव सेने चे असे म्हणणे आहे की म.न.से. ने त्यांचा मराठी भाषेचा मुद्दा चोरला !! आणि शिव सेनेचे हिंदुत्व सर्वांनाच माहित आहे.. मग जात आणि भाषेच्या मुद्द्या वर जाणते मध्ये कोण फुट पाडत आहे ? ----------------------------------------------------------------------------------------- 'विदर्भ बंद/बंड' 'हिट', ऐन थंडीत वातावरण 'हॉट' ट्रेन व्यवस्था आणि सर्व जनताभिमुख व्यवस्था बंद करायच्या आणि बंद यशस्वी झाल्याचा दावा करायचा.. जर विदर्भ होण्याच्या आधी हे असे तर विदर्भ झाल्यावर रोजच बंद करतील.. "बसेसवर दगडफेक झाली, पण बससेवा बंद झाल्यानंतर पुन्हा सारं सामसूम होऊन गेलं. " होणारच ना !! हि काय पद्धत आहे का बंद पुकारायची.. हे बंद पुकारणारे, बसेसवर दगडफेक करणारे आंदोलक आणि दंगलखोर सारखेच नाहीत का.. मग दंगलखोरांना जरा "दिसताक्षणी गोळ्या" घालायचा आदेश इथे ह्या हिंसक आंदोलकांना का देऊ नये अथवा दिल...

सत्याची हत्या

काही हलकट नराधमांनी सतीश शेट्टी या अन्यायाला वाचा फोडणाऱ्या कार्यकर्त्याची हत्या केली आहे.. ही केवळ हत्या नसून भारताच्या सद्यस्थितीचे प्रतिबिंब आहे.. जो माणूस अन्याय आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात उभा राहतो त्याचा असा शेवट होणे हे केवळ आपल्या "सुव्यवास्थे" अधपतन आहे.. आणि जर शासनाने यावर काहीही हालचाल केली नाहीतर यामध्ये शासन आणि शिपुरद्यान्चा (शिपुरडे म्हणजे पोलीस) देखील हात आहे हेच सिद्ध होते.. अजून किती दिवस हे चालणार ? बिल्डर्स, नगरसेवक, शासकीय कर्मचारी, कदाचित पोलीस देखील उद्या दिवसाढवळ्या अन्याय करत फिरतील.. प्रदीप शर्माने ते दाखवून दिले आहेच.. जमिनीला आले भाव कि गैरव्यवहार चालू.. याची शेती त्याच्या नावावर आणि जमिनी हडप करणे आलेच ओघाने.. आणि त्याला झकास पैकी राजकीय आशीर्वाद हे तर उघडे गुपित आहे. ह्यावर अंकुश कुणाचाही नाही.. मोकाट सुटलेले हे हव्यासी लोक त्यांच्या आड येणाऱ्या लोकांचा असा मारेकरी घालून जीव घेतात.. आणि अर्थात आपल्या न्यायालयाची न्यायदेवता आंधळी आहे... त्यामुळे उघड्या डोळ्याने काही नाही दिसत आणि न्यायचे दूत (न्यायाधीश आणि वकील) म्हणजे जे दाखवतात ते मान्य अस...

म्हणे शेतकरी सावरला पाहिजे - शरद पवार

शेतकरी सावरला पाहिजे - शरद पवार पेरायला बियाणे नकली खते नकली द्यायला पाणी नाही पाणी आहे तर वीज नाही सगळे आहे तर मालाला भाव नाही कर्ज मिळत नाही.. तिथे नोकरशहा त्रास देतो.. अडत दुकानदार आणि दलाल सर्रास लुटतात नद्यांवर बांध नाहीत, बांध घातले कि फोडतात पाण्याची पातळी कमी होतेय आणि एखाद्या वर्षी सगळे जुळून आले की निसर्ग आपली कळा दाखवतो.. अवकाळी पाऊस दिवसभर शेतात काबाडकष्ट करून काम केल्यापेक्षा शेतकरी म्हणतात कि हापिसात प्यून लागले तरी चालेल. साहेब कसा सावरणार शेतकरी ? उगाच आपले काहीतरी बोलू नका.. काही करा... ------------------------------------------------------------------------ कोठडीत गुंडांकडून धोक्याचा प्रदीप शर्माचा दावा वा !! म्हणजे प्रदीप शर्मा ने हजारो कोटी गुंडांकडून कमावले.. अर्थात गुंड संपवले ही चांगली बाब.. पण म्हणजे पोलिसांसाठी कामा न करता गुंडांच्या टोळ्यांसाठी काम केले.. जर त्या टोळ्यांनी नसते दिले पैसे तर इतक्या तत्परतेने संपवले असते का हे गुंड ?? असंगाशी संग प्राणाशी गाठ ------------------------------------------------------------- ऍन्टॉप हिल येथे पोलिसाला मारहाण घ्या !! आत...

रुचिका प्रकरणी राठोड यांना जामीन मंजूर ????

न्यायालय आहे की घाणीचा संडास ?? म्हणजे १५ वर्षाच्या मुलीचा विनयभंग करून तिला आत्महत्या करायला प्रवृत्त केले आणि हे प्रकरण १९ वर्षांनी बाहेर आले तरी हे (अ)न्यायालय अशा नराधमाला जामीन मंजूर करते ? का करेल सामान्य माणूस न्यायालयावर विश्वास ? जर ह्याला जर न्याय म्हणाले तर अन्याय कशाला म्हणणार ?? भारताच्या लोकशाहीचा(?) हा स्तंभ इतका तकलादू आहे का? इथे कोत्यावाधीचा अपहार आणि भ्रष्ट राजकारणी बाहेर राहतात आणि कसाब सारखी डुक्करे करदात्यांच्या पैशाने मजा करतात त्यांना न्यायालय वठणीवर आणू शकत नाही का? आणि जर तुरुंगवास घडायची पाळी आली की हे हरामी लगेच आजारी होतात.. सरूपसिंग नाईक ने नाही का सगळा तुरुंगवास (?) इस्पितळात भोगला. आणि जर न्यायालय काही करू शकत नसेल तर तसे प्रसिद्ध करावे कि आम्ही काहीही करू शकत नाही.. आम्ही षंढ राजकारणाचे लाचार आहोत असे.. कमीत कमी लोकांना त्रास तरी नाही होणार कि न्याय नाही मिळाला म्हणून..

१३ जानेवारी - बातम्या आणि प्रतिक्रिया

'त्या' नगरसेवकाचे उद्धव ठाकरेंकडून समर्थन असे कसे? मारहाण करून पाणी प्रश्न सुटणार आहे का? त्यापेक्षा तलाव बंध, गाळ काढा काहीतरी विधायक कार्ये केले तरच शिव-सेना हा लोकांसाठी झटणारा पक्ष म्हणून परत नावारूपाला येईल.. उगाच गुंडगिरी करून काय होतेय.. जर कार्याध्यक्ष (?) असे समर्थन करत असतील तर सगळेच शिव सैनिक अशी मारहाण चालू करतील आणि मग एक दिवस सरकारी लोक हापिस बंद करतील. मग जे काम होतेय ते देखील होणार नाही.. पाणीच नसेल तर तो अभियंता तरी कुठून पाणी देणार ? -------------------------------------- 'थ्री इडियट्‌स'ची १९ दिवसांत ३१५ कोटींची कमाई उत्तम मनोरंजन !! असेच TITANIC आणि AVTAAR चा विक्रम मोडा.. आमीर खान सर्वोत्तम अभिनेता आहे.. ------------------------------------------------------- कसाबने दिला ८९१ प्रश्‍नांचा जबाब अजून सवाल जबाब चालूच आहे का ? अजून किती दिवस, वर्षे चालणार आहे ? मूर्ख न्यायालय (?) आणि मूर्ख सरकार.. ----------------------------------------------------------------------

१२ जानेवारी बातम्या आणि प्रतिक्रिया

"झेंडा' फडकणार! राणे टोळीने आपली न्युसंस व्हॅल्यू पटवून दिली.. -------------------------------------------------- धान्यापासून मद्यनिर्मिती : नवीन कारखान्यांना परवानगी नाही दारू लॉबी म्हणजेच मंत्री लॉबीने ३६ कारखाने कुठल्या "समाजसेवकांना" दिलेत ते सांगितले तर बरे होईल.. थोबाड वर करून सांगतायत कि नवीन परवानगी नाही देणार. ------------------------------------------------------------------- गंगेवरील पर्यटनासाठी बिहार मंत्रिमंडळाची बैठक गंगेवर पर्यटन विकास करणार आणि गंगा अजून दुषित करणार... मूर्ख बिहारी मंत्रांना काहीतरी मलई दिसली असणार यात.. ----------------------------------------------------------------- वर्षानंतरही बुलेटप्रूफ जाकिटे नाहीत! कशाला असतील.. पोलीस जिवंत काय मेले काय त्याचे ह्या राजकारणी कुत्र्यांना काहीही पडले नाही.. स्वतः मात्र भारीचे बुलेट प्रुफ जाकीट घालतील आणि त्यांचे रक्षण करणारा पोलीस मात्र तसाच.. मेला तर पोलीस मारेल आणि हे वाचतील.. किती दुर्दैव !! --------------------------------------------------- शेतकऱ्यांच्या आत्महत्या हमी भावामुळे टळतील - राज...

धान्यापासून दारू !! उत्तम लेख, जरूर वाचावा

धान्यापासून दारू निर्मितीला पाठींबा देणाऱ्या "विद्वान" मंत्र्यांनी हा लोकसत्ता चा लेख जरूर वाचून त्यावर राजू शेट्टी यांच्या सारखी प्रतिक्रिया जर दम असेल तर द्यावी. http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=38730:2010-01-09-16-39-06&catid=55:2009-07-20-04-00-45&Itemid=१३ राजू शेट्टी यांना सकाळ मध्ये ओपन लेटर पाठवून काही प्रश्न विचारले होते, त्यावर त्या भल्या माणसाने खुलासा दिला होता.. अभिनंदनीय आहे हे.. तसे आपले महान मंत्री गणेश नाईक, लक्ष्मण ढोबळे आणि जमले तर अशोक चव्हाण काही प्रतिक्रिया देऊ शकतील का ???

अवधूतची फरफट सुरूच...'झेंडा'ची डीव्हीडी पाठवली नारायण राणेंकडे!

अरेरे !! एका नवोदित निर्मात्याला इतका त्रास देणे हे नारोबा राणेला शोभते का? नक्की मुद्दा काय आहे तेच नाही काळात.. जर त्याच्यासारखे असले पात्र तर काय बिघडले ? शेवटी चित्रपट हा मनोरंजनासाठी आहे ना !! आणि खर्या आयुष्यात नारायण राणे काय ग्रेट माणूस आहे कि काय ? ह्या महात्म्याची सत्ता लालसा सगळ्यांना ठाऊक आहे.. अवधूत गुप्ते ना बेस्ट लक.. मित्र तुझा जन्म भारतात झाला आहे आणि मूर्ख राजकारणी लोकांच्या जीवनावर (?) तू चित्रपट काढत आहेस हीच तुझी चूक आहे.. तू तुझा फायदा नुकसान काय होते ते बघ आणि अशोक चव्हाण यांच्या आवाहनाला दाद देऊन तू तक्रार कर.. भलेही अशोक चव्हाण त्याचा राजकीय लाभ उठवतील पण राणे सारख्या विघ्नसंतोषी माणसाला धडा तर मिळेल.. त्यानंतर मात्र तुला आयुष्यभर राणे टोळीपासून धोका उद्भवू शकतो.. पण याला काहीही इलाज नाही कारण नितेश राणे आणि त्याचे पूज्य पिताश्री यांच्यासारख्यांनी पूर्ण भारत बरबटला आहे..

अमरसिंहांचा राजीनामा नामंजूर - मुलायम

नौटंकी !! केवळ नाटक !! मी मारल्या सारखे करतो तू रडल्यासारखे कर.. काहीही कर पण प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी जोकर अमरसिंग आणि मुलायम काहीपण करतात.. -------------- माध्यमांचे वार्तांकन चुकीचे - थरूर थरूर यांनी सार्वजनिक बैठकांना जाण्याच्या आधी तंबाखू खावी म्हणजे तोंड बंद तरी राहील.. -------------------------------------------------- द्रुतगती मार्गावर कुंपण तोडून रस्ते! म्हणजे असले धंदे करायचे आणि काही अपघात झाला कि रास्ता रोको करायचा.. काय मूर्ख लोक आहेत आपले.. म्हणजे स्वतः नीट राहायचे नाही आणि जर सरकारने चांगली सोय केली तर त्याची वात लावायची आणि परत भणंग रहायचे.. लायकीच हि ह्यांची... --------------------------------------------------------- गावितांची बँकेत अफरातफर? परत हे भिकार राजकारणी ह्यांच्याच बँकेत गैरव्यवहार करतात आणि सामान्य लोकांच्या ठेवी बुडवतात.. असल्या केस मध्ये लोकांनी जर असल्या हलकट लोकांना धरून मारले तर मजा येईल.. -------------------------------------------- भररस्त्यात इन्स्पेक्टरची हत्या आरोग्यमंत्री एम. आर. के पन्नीरसेल्वम आणि क्रीडा व पर्यावरणमंत्री थिरू टी. पी. एम. म...

दूरदर्शी ग.दि.माडगूळकर

भारताची सध्यस्थिती आणि काही दशकापूर्वी लिहिलेली गदिमांनी हि कविता केवळ गदिमांचा दूरदर्शीपणा दाखवते.. राजकीय लाभासाठी देश विकायला काढणाऱ्या चिंधीचोर राजकारण्यांनी हि कविता जरूर वाचावी.. ज्या देशात अंधश्रद्धा अमाप असतात, पण धर्म असा एकही असत नाही त्या देशाची दशा दयनीय असते. जो देश स्वतः न कातलेली वस्त्रे अंगावर धारण करतो स्वतः न पिकवलेल्या धान्याची भाकर खाऊन पोट भरतो त्या देशाची दशा दयनीय असते. अंत्ययात्रेची वाटचाल चालताना ज्यांच्या ओठांना वाचा फुटते भूतकालीन भग्नावशेषच ज्यांच्या अभिमानाचे विषय होतात त्यांच्या देशाची दशा दयनीय असते. वधस्थलावरला ओंडका व मारेकर्‍याची कुर्‍हाड यांच्या कचाट्यात कंठ आल्यावर ज्यांना बंडाचा उठाव आठवतो त्यांच्या देशाची दशा दयनीय असते. जेत्याचे स्वागत ज्या देशात तुतार्‍यांच्या ललकारीने होते अन् पदच्युतांची पाठवणी हेटाळण्यांच्या आरोळ्यांनी केली जाते, पण ती कशासाठी ? तर नव्या सत्ताधार्‍यांचे स्वागत पुन्हा तुतार्‍यांनी करण्यासाठीच म्हणूनच त्या देशाची दशा दयनीय असते. ज्या देशातले ऋषीमुनी वर्षानुवर्षे मौन राखतात अन् पराक्रमी पुरूष पाळण्यात पडून मुठी चोखत असतात त्या द...

...तर 'स्वाभिमान'वाले 'झेंडा' रोखणार आणि इतर

"...तर 'स्वाभिमान'वाले 'झेंडा' रोखणार" याला म्हणतात "मान या ना मान मी तेरा मेहमान" किंवा "संडास मालकाचा आणि रुबाब साफ करणार्याचा".. काही संबंध आहे का नितीश राणे (नारोबा राणेंचे सुपुत्र हीच त्यांची ओळख) याच्याशी !! आत्ताच पाणी मोर्चा काढून थोबाड रंगवून घेतले माणिकराव ठाकरेंकडून तरी अक्कल नाही आली.. म्हणजे स्वाभिमान संघटना व्य्क्तीपुजक आहे.. त्याचा "स्वाभिमान" शी काहीही संबंध नाही ? शेतकऱ्यांसाठी आणि पाण्यासाठी आंदोलने केल्यापेक्षा काही तरी विधायक कामे केली तर कुणी ऐकेल तरी.. उगाच गोंधळ करून सवंग प्रसिद्धी मिळवायचा अट्टाहास का ? -------------------------------------------------------- सुरिंदर कोलीच्या मृत्यूदंडाला स्थगिती घ्या !! आपल्या "न्याय"व्यवस्थेचे उत्तम उदाहरण. होपलेस लेकाचे !! ---------------------------------------------------------------------- अमरसिंह यांनी सोडली 'सप'ची तिन्ही पदे आता हे सर्व राजकारण पण दे सोडून म्हणावे.. उगाच जोकरगिरी करून प्रसिद्धीच्या झोतात तरी नाही दिसणार. उथळ वक्तव्यांमुळे टीवी वा...

दीपक मानकर यांचे निलंबन मागे???

अरे काय थट्टा आहे.. असल्या गुंडाला राजमान्यता मिळाली.. हाच आदर्श समोर ठेवला आहे का कॉंग्रेस ने? अजून किती करणार आहात राजकारणाचे गुन्हेगारीकरण ?? म्हणजे हा चोर सरळ आता पोलिसांना दटावाणार.. ऱ्हास.. भारताचा शेवट फार दूर नाही.. --------------------------------------- रॅगिंगप्रकरणी १८ विद्यार्थ्यांची वसतिगृहातून हकालपट्टी नुसते हाकलाताय??? त्यांची धिंड का नाही काढलीत गाढवावरून ? --------------------------------------- ऑस्ट्रेलियासोबतचे संबंध धोक्यात - कृष्णा वा !! म्हणजे एक खून झाला तर संभंध धोक्यात? आणि जर तो दुर्दैवी माणूस भारतात मेला असता तर थोबाड वर करून पहिले तरी असते का ? इथे कसाब ने १७० लोक मारले तरी आहे न जिवंत तो ? आपल्या भूमीत काही पण चालते ? म्हणजे ऑस्ट्रेलिया वर प्रेशर टाकायलाच हवे त्याबद्दल वाद नाही.. मुलांनो ऑस्ट्रेलिया मध्ये १-२ नाहीतर लाखोंच्या संख्येने जा. तिथल्या लोकांना ब्राऊन माणूस गैर वाटला नाही पाहिजे.. असल्या भ्याड हल्ल्यांनी काहीही होणार नाही.. --------------------------------------- शस्त्रे खाली ठेवा मगच चर्चा करू हे अगदी बरोबर आहे.. नुसत्या शाळा उडवतात मूर्ख लेका...

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री लक्ष्मण ढोबळे ची मुक्ताफळे

"राज्यामध्ये पीक मोठ्याप्रमणात येत आहे. त्याला चांगला भाव मिळावा म्हणून डिस्टलरीला मान्यता दिली, मद्यनिर्मितीचाही निर्णय घेतला." आता याला काय म्हणावे.. महागाई वाढली आहे आणि एकाचा पगार पुरत नाही म्हणून दोघांना नोकरी करावी लागते.. तूर डाळ १०० च्या वर गेली आहे, फळभाजी १० रुपये पाव च्या खाली नाही, तीच गत पालेभाजीची.. आणि मग हे सगळे काय खूप पीक येते म्हणून ? प्यायला पाणी नाही तर शेतीला कुठून देणार. आणि हे महान माननीय आणि अतिशय कमी बुद्धी असलेले आपले मंत्री म्हणत आहे कि राज्यात पीक मोठ्या प्रमाणात येत आहे म्हणून त्यापासून मद्य निर्मिती करावी.. स्वतःच काही नशेत आहे कि काय तपासावे लागेल.. असले येडपट मंत्री म्हणे महाराष्ट्राला पुढे नेणार.. थू ह्यांच्यावर..