म्हणून या मुर्खांचा राग येतो.. इथे येउन घाण करतात.. स्वतःच्या राज्यांची अशीच वाट लावली आता बाकी ठिकाणची वाट लावत आहेत. |
थोडक्यात १४/१२/२००९
बिल्डर सेवलेकरांना अंतरिम अटकपूर्व जामीन - या बातमीला इतके महत्व मिळण्याचे कारण म्हणजे पत्रकारांना मारहाण झाली.. हे हरामखोर बिल्डर लोक रोजच लोकांना धमकावत असतात आणि त्यांना लुटत असतात, सामान्य लोकांच्या जमिनी हडप करतात स्थानिक गुंडांच्या मदतीने तेव्हा इतका नाही गदारोळ होत ते ? "खोसला का घोसला" सारख्या तर अगणित केसेस आहेत पुण्यात.. बिल्डर पोलीस लोकांना खुश ठेवत असतात त्यामुळे पोलीस साधी तक्रार पण नाही लिहून घेत.. आणि जर अगदी कुणी कोर्टात जायचे म्हणाले तर सरळ थोबाड वर करून पैसे मागतात.. आणि सगळे करून कोर्टात गेलेच तर आपले महान कोर्ट निकाल पक्षकाराचा "निकाल" लावेल.. २० वर्षे ठेवेल केस रखडत.. दीपक मानकर चे काय झाले? अनिल भोसले इतक्या लवकर इतका वर कसा पोचला.. गोयल गंगा च्या निकृष्ट बांधकामाने एकाचा जीव गेला होता ना त्याचे काय झाले ? TDR प्रकरणात तर किती बिल्डर, नोकरशहा आणि किती राजकारणी लोक अडकले आहेत याचा काही हिशोबच नाही.. असे हजारो बिल्डर रोज लोकांना नादात असतात.. कोलते पाटील तर बांधलेल्या बिल्डींग ची सोसायटी करत नाही आणि मग FSI घेतो आणि कुठेतरी दुसरीकडे वापरतो.. आणि ...
Comments
Post a Comment