बिल्डर सेवलेकरांना अंतरिम अटकपूर्व जामीन - या बातमीला इतके महत्व मिळण्याचे कारण म्हणजे पत्रकारांना मारहाण झाली.. हे हरामखोर बिल्डर लोक रोजच लोकांना धमकावत असतात आणि त्यांना लुटत असतात, सामान्य लोकांच्या जमिनी हडप करतात स्थानिक गुंडांच्या मदतीने तेव्हा इतका नाही गदारोळ होत ते ? "खोसला का घोसला" सारख्या तर अगणित केसेस आहेत पुण्यात.. बिल्डर पोलीस लोकांना खुश ठेवत असतात त्यामुळे पोलीस साधी तक्रार पण नाही लिहून घेत.. आणि जर अगदी कुणी कोर्टात जायचे म्हणाले तर सरळ थोबाड वर करून पैसे मागतात.. आणि सगळे करून कोर्टात गेलेच तर आपले महान कोर्ट निकाल पक्षकाराचा "निकाल" लावेल.. २० वर्षे ठेवेल केस रखडत.. दीपक मानकर चे काय झाले? अनिल भोसले इतक्या लवकर इतका वर कसा पोचला.. गोयल गंगा च्या निकृष्ट बांधकामाने एकाचा जीव गेला होता ना त्याचे काय झाले ? TDR प्रकरणात तर किती बिल्डर, नोकरशहा आणि किती राजकारणी लोक अडकले आहेत याचा काही हिशोबच नाही.. असे हजारो बिल्डर रोज लोकांना नादात असतात.. कोलते पाटील तर बांधलेल्या बिल्डींग ची सोसायटी करत नाही आणि मग FSI घेतो आणि कुठेतरी दुसरीकडे वापरतो.. आणि ...
अरेरे !! एका नवोदित निर्मात्याला इतका त्रास देणे हे नारोबा राणेला शोभते का? नक्की मुद्दा काय आहे तेच नाही काळात.. जर त्याच्यासारखे असले पात्र तर काय बिघडले ? शेवटी चित्रपट हा मनोरंजनासाठी आहे ना !! आणि खर्या आयुष्यात नारायण राणे काय ग्रेट माणूस आहे कि काय ? ह्या महात्म्याची सत्ता लालसा सगळ्यांना ठाऊक आहे.. अवधूत गुप्ते ना बेस्ट लक.. मित्र तुझा जन्म भारतात झाला आहे आणि मूर्ख राजकारणी लोकांच्या जीवनावर (?) तू चित्रपट काढत आहेस हीच तुझी चूक आहे.. तू तुझा फायदा नुकसान काय होते ते बघ आणि अशोक चव्हाण यांच्या आवाहनाला दाद देऊन तू तक्रार कर.. भलेही अशोक चव्हाण त्याचा राजकीय लाभ उठवतील पण राणे सारख्या विघ्नसंतोषी माणसाला धडा तर मिळेल.. त्यानंतर मात्र तुला आयुष्यभर राणे टोळीपासून धोका उद्भवू शकतो.. पण याला काहीही इलाज नाही कारण नितेश राणे आणि त्याचे पूज्य पिताश्री यांच्यासारख्यांनी पूर्ण भारत बरबटला आहे..
"वेगावर नियंत्रण आणण्यासाठी वरळी सी फेसवर काही दिवसांपूर्वी 'स्पीड गन' ठेवल्या. या गनमधून प्रत्येक गाडीचा वेग मोजता येतो. वेगाची मर्यादा ओलांडली तर ड्रायव्हरला दंड होतो." असले सुसाट चालवणारे रस्त्यावरून चालत असलेल्या लोकांचा जीव घेतात.. आणि आपले महान न्यायालय त्यांना शिक्षा करू शकत नाही .. सलमान खान, संजीव नंदा, परेरा पासून परवा परवा त्या कुणी सोधीने एकाचा जीव घेतला दिल्ली मध्ये आपल्या मर्सिडीज खाली.. अशी हलकट प्रवृत्ती थांबवायची असेल तर स्पीड गन नको खरीच गन ठेवायला हवी.. केले उल्लंघन घाल गोळी.. असे ५-५० मारू देत मग येतील सगळे ठिकाणावर.. सिग्नल तोडून जाणारे तर झेब्रा क्रोस्सिंग वर चालणार्यांकडे लक्ष पण नाही देत.. आणि मग बिचारे चालणारे कधी कधी जखमी होतात आणि हे चोर जातात पळून.. असल्या लोकांना देखील तसेच मारले पाहिजे त्याशिवाय थांबणार नाही हे.. मला माननीय लेखक पु.ल. देशपांड्यांच्या असा मी असा मी (किंवा माझे पौष्टिक जीवन) मधले वाक्य आठवते.. "आपल्या लोकांच्या हंटर हवा" आणि तेच खरे आहे.. २-४ हंटर पडले बुडावर की सुधारतील बरोबर.. त्याशिवाय अवघड आहे.
Comments
Post a Comment