महान पिता विलासराव देशमुख
बघा बघा कुत्र कसे पीठ खाते आहे.. हा लेख जरूर वाचा http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=46419:2010-02-08-19-01-08&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=२
म्हणजे विलास देखमुख फक्त त्याच्या मुलांच्या कंपन्यांसाठी काम करत आहे. एकीकडे इंडियाबुल्स ला टेंडर्स मिळवून द्यायचीत आणि आता सद्या अवजड उद्योगमंत्री असल्याने धान्यापासून दारू निर्माण करायचे कारखान्यांचे परवाने दुसर्या पोराला मिळवून द्यायचे.. नुसते हे नव्हे तर "खराब" ज्वारी व्यापार्यांकडून विकत घेऊन हे धंदे करायचे..
जर ज्वारी खराबच घायची होती तर मग सरकारकडून घ्यायची होती ना किंवा ११.५ रुपये किलोने शेतकर्यांनी पण विकली असती कि खराब ज्वारी... पण मग व्यापार्यांकडून विकत घेतली म्हणजे परत बाजारात त्याचा साठ नसल्याने भाव वाढणार.. आणि नुसते हेच नाही तर त्या कारखान्यांना अनुदाने पण मिळवून द्यायची.. वा रे वा.. म्हणजे नुसती चोरी नाही तर सरकारी चोरी पण..
आणि हे अल्कोहोल खरच औद्योगिक आहे कि औद्योगिक प्रमाणावर अल्कोहोल बनवणे चालू आहे ?
आणि तिसरा मुलगा रितेश देशमुख ला राम गोपाल वर्मा सारख्या दिग्दर्शकाचे सिनेमे मिळवून द्यायचे.. हेच कि ते आपले विलासराव जे २६/११ च्या हल्ल्यानंतर RGV ला घेऊन गेले होते ताज ची पाहणी करायला..
अरे देवा कसे होणार महाराष्ट्राचे... हे असले आदर्श पिता असल्या वर लोक अजून भुकेले राहतील..
असल्या हलकट माणसाला मंत्रिपद मिळते हा भारताच्या लोकशाहीचा (?) पराभव आहे..
महाराष्ट्र उगाच नाही मागे पडत चालला आहे..
एकीकडे हि असली कुत्री लचके तोडत आहे आणि दुसरीकडे शिव सेना मराठी मराठी करत इतर राज्यात काम करायला जाणार्या मराठी लोकांचे भवितव्य धोक्यात घालत आहे.. आणि प्रत्यक्ष मुंबईसाठी आणि महाराष्ट्रासाठी काहीच नाही.. मुंबई ला बॉम्बे म्हणाल्याने काय पोट भरते का हो?
Comments
Post a Comment