Posts

Showing posts with the label maharashtra

काय मजा चालू आहे नाही महाराष्ट्रात

काय मजा चालू आहे नाही महाराष्ट्रात ... इतक्या समस्या असताना आपले सर्कार शाहरुख़ खान, मराठी अमराठी वाद आणि IPL सामने यांच्याकडे अगदी जातीने लक्ष पुरवत आहे.. म्हणजे  महागाई, बेरोजगारी, पाणी समस्या, लोडशेडिंग, बाल मजुरी, कन्या भ्रुण हत्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कर्जबाजारी महाराष्ट्र, अधिवासी वसलेली अंधश्रद्धा, कुपोषण, खराब रस्ते, शिक्षणात वाढणाऱ्या आत्महत्या, सहकार साखर घोटाळे, सहकार बँक घोटाळे या बद्दल या राजकारणी कुत्र्यांना काहीही देणे घेणे नाही.. फक्त काहीतरी फालतू बकबक करून भिक्कार मीडिया च्या जोतात रहायचे..  अरेरे उगाच नाही गुजरात नंबर एक चे राज्य होते आहे.. 

महान पिता विलासराव देशमुख

बघा बघा कुत्र कसे पीठ खाते आहे.. हा लेख जरूर वाचा  http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=46419:2010-02-08-19-01-08&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid= २ म्हणजे विलास देखमुख फक्त त्याच्या मुलांच्या कंपन्यांसाठी काम करत आहे. एकीकडे इंडियाबुल्स ला टेंडर्स मिळवून द्यायचीत आणि आता सद्या अवजड उद्योगमंत्री असल्याने धान्यापासून दारू निर्माण करायचे कारखान्यांचे परवाने दुसर्या पोराला मिळवून द्यायचे.. नुसते हे नव्हे तर "खराब" ज्वारी व्यापार्यांकडून विकत घेऊन हे धंदे करायचे.. जर ज्वारी खराबच घायची होती तर मग सरकारकडून घ्यायची होती ना किंवा ११.५ रुपये किलोने शेतकर्यांनी पण विकली असती कि खराब ज्वारी... पण मग व्यापार्यांकडून विकत घेतली म्हणजे परत बाजारात त्याचा साठ नसल्याने भाव वाढणार..  आणि नुसते हेच नाही तर त्या कारखान्यांना अनुदाने पण मिळवून द्यायची.. वा रे वा.. म्हणजे नुसती चोरी नाही तर सरकारी चोरी पण.. आणि हे अल्कोहोल खरच औद्योगिक आहे कि औद्योगिक प्रमाणावर अल्कोहोल बनवणे चालू आहे ? आणि तिसरा मुलगा रितेश देशमुख ला राम गोपाल ...

TAXI PERMIT कायदा काय म्हणतो ?

कायदा म्हणतो महाराष्ट्र मोटार वाहन नियम -२४ लोकसेवा वाहन चालविणाऱ्या चालकांचे अधिकारपत्र:- (१) मोटार कॅब वगळता लोकसेवा वाहन चालविण्याचे अधिकारपत्र देण्यात आले आहे, अशा प्रत्येक व्यक्तीला एक धातूचा बिल्ला देण्यात येईल. त्यासाठी शर्त अशी असेल की, त्या व्यक्तीला ती ज्या भागात वाहन चालविणार आहे, त्या भागाची भौगोलिक माहिती असल्याबद्दल आणि मराठीचे व त्या भागात जास्त प्रमाणात बोलल्या जाणाऱ्या कोणत्याही भाषेचे कामचलाऊ ज्ञान असल्याबद्दल प्राधिकाऱ्याला खात्री पटवून दिली पाहिजे. शासनाचे स्पष्टीकरण टॅक्सीचालकांना परवाने देण्याच्या निर्णयाबाबत अधिवासाचा कालावधी व भाषेच्या अनुषंगाने राज्य मोटार वाहन नियम १९८९ च्या तरतुदींत कोणताही बदल केलेला नाही. महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ४ (२) आणि नियम २४ (१) नुसार महाराष्ट्रात टॅक्सी चालविण्यासाठी अधिकृत परवानगी प्राप्त करू इच्छिणाऱ्या अर्जदाराला ज्या क्षेत्रात तो टॅक्सी चालवू इच्छितो त्या क्षेत्राची माहिती असणे तसेच त्याला मराठीचे व्यावहारिक ज्ञान आणि त्या क्षेत्रात सर्वसामान्यपणे बोलल्या जाणाऱ्या भाषेचे ज्ञान आवश्यक असणे आवश्यक आहे. तसेच अशा ...

धान्यापासून दारू !! उत्तम लेख, जरूर वाचावा

धान्यापासून दारू निर्मितीला पाठींबा देणाऱ्या "विद्वान" मंत्र्यांनी हा लोकसत्ता चा लेख जरूर वाचून त्यावर राजू शेट्टी यांच्या सारखी प्रतिक्रिया जर दम असेल तर द्यावी. http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=38730:2010-01-09-16-39-06&catid=55:2009-07-20-04-00-45&Itemid=१३ राजू शेट्टी यांना सकाळ मध्ये ओपन लेटर पाठवून काही प्रश्न विचारले होते, त्यावर त्या भल्या माणसाने खुलासा दिला होता.. अभिनंदनीय आहे हे.. तसे आपले महान मंत्री गणेश नाईक, लक्ष्मण ढोबळे आणि जमले तर अशोक चव्हाण काही प्रतिक्रिया देऊ शकतील का ???