"एक अग्रणी नेते जांबुवंतराव धोटे यांनी दोनच दिवसांपूर्वी चंद्रपूर येथील एका बैठकीत वेळ पडल्यास आंदोलनासाठी नक्षलवाद्यांची मदत घेऊ".. या महाशयांना अतिरेकी विरोधी कारवाई कायद्याखाली अटक का करू नये ?? असली मुक्ताफळे उधळताना लाज देखील नाही वाटत.. अप्रत्यक्षरीत्या हे नक्षलवाद्यांना पाठींबा देण्यासारखेच झाले ना !! आपले माननीय आणि कुचकामी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यावर काहीच कसे नाही बोललेत ??
कायदा म्हणतो महाराष्ट्र मोटार वाहन नियम -२४ लोकसेवा वाहन चालविणाऱ्या चालकांचे अधिकारपत्र:- (१) मोटार कॅब वगळता लोकसेवा वाहन चालविण्याचे अधिकारपत्र देण्यात आले आहे, अशा प्रत्येक व्यक्तीला एक धातूचा बिल्ला देण्यात येईल. त्यासाठी शर्त अशी असेल की, त्या व्यक्तीला ती ज्या भागात वाहन चालविणार आहे, त्या भागाची भौगोलिक माहिती असल्याबद्दल आणि मराठीचे व त्या भागात जास्त प्रमाणात बोलल्या जाणाऱ्या कोणत्याही भाषेचे कामचलाऊ ज्ञान असल्याबद्दल प्राधिकाऱ्याला खात्री पटवून दिली पाहिजे. शासनाचे स्पष्टीकरण टॅक्सीचालकांना परवाने देण्याच्या निर्णयाबाबत अधिवासाचा कालावधी व भाषेच्या अनुषंगाने राज्य मोटार वाहन नियम १९८९ च्या तरतुदींत कोणताही बदल केलेला नाही. महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ४ (२) आणि नियम २४ (१) नुसार महाराष्ट्रात टॅक्सी चालविण्यासाठी अधिकृत परवानगी प्राप्त करू इच्छिणाऱ्या अर्जदाराला ज्या क्षेत्रात तो टॅक्सी चालवू इच्छितो त्या क्षेत्राची माहिती असणे तसेच त्याला मराठीचे व्यावहारिक ज्ञान आणि त्या क्षेत्रात सर्वसामान्यपणे बोलल्या जाणाऱ्या भाषेचे ज्ञान आवश्यक असणे आवश्यक आहे. तसेच अशा ...
काही हलकट नराधमांनी सतीश शेट्टी या अन्यायाला वाचा फोडणाऱ्या कार्यकर्त्याची हत्या केली आहे.. ही केवळ हत्या नसून भारताच्या सद्यस्थितीचे प्रतिबिंब आहे.. जो माणूस अन्याय आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात उभा राहतो त्याचा असा शेवट होणे हे केवळ आपल्या "सुव्यवास्थे" अधपतन आहे.. आणि जर शासनाने यावर काहीही हालचाल केली नाहीतर यामध्ये शासन आणि शिपुरद्यान्चा (शिपुरडे म्हणजे पोलीस) देखील हात आहे हेच सिद्ध होते.. अजून किती दिवस हे चालणार ? बिल्डर्स, नगरसेवक, शासकीय कर्मचारी, कदाचित पोलीस देखील उद्या दिवसाढवळ्या अन्याय करत फिरतील.. प्रदीप शर्माने ते दाखवून दिले आहेच.. जमिनीला आले भाव कि गैरव्यवहार चालू.. याची शेती त्याच्या नावावर आणि जमिनी हडप करणे आलेच ओघाने.. आणि त्याला झकास पैकी राजकीय आशीर्वाद हे तर उघडे गुपित आहे. ह्यावर अंकुश कुणाचाही नाही.. मोकाट सुटलेले हे हव्यासी लोक त्यांच्या आड येणाऱ्या लोकांचा असा मारेकरी घालून जीव घेतात.. आणि अर्थात आपल्या न्यायालयाची न्यायदेवता आंधळी आहे... त्यामुळे उघड्या डोळ्याने काही नाही दिसत आणि न्यायचे दूत (न्यायाधीश आणि वकील) म्हणजे जे दाखवतात ते मान्य अस...
Comments
Post a Comment