म्हणे शेतकरी सावरला पाहिजे - शरद पवार
शेतकरी सावरला पाहिजे - शरद पवार पेरायला बियाणे नकली खते नकली द्यायला पाणी नाही पाणी आहे तर वीज नाही सगळे आहे तर मालाला भाव नाही कर्ज मिळत नाही.. तिथे नोकरशहा त्रास देतो.. अडत दुकानदार आणि दलाल सर्रास लुटतात नद्यांवर बांध नाहीत, बांध घातले कि फोडतात पाण्याची पातळी कमी होतेय आणि एखाद्या वर्षी सगळे जुळून आले की निसर्ग आपली कळा दाखवतो.. अवकाळी पाऊस दिवसभर शेतात काबाडकष्ट करून काम केल्यापेक्षा शेतकरी म्हणतात कि हापिसात प्यून लागले तरी चालेल. साहेब कसा सावरणार शेतकरी ? उगाच आपले काहीतरी बोलू नका.. काही करा... ------------------------------------------------------------------------ कोठडीत गुंडांकडून धोक्याचा प्रदीप शर्माचा दावा वा !! म्हणजे प्रदीप शर्मा ने हजारो कोटी गुंडांकडून कमावले.. अर्थात गुंड संपवले ही चांगली बाब.. पण म्हणजे पोलिसांसाठी कामा न करता गुंडांच्या टोळ्यांसाठी काम केले.. जर त्या टोळ्यांनी नसते दिले पैसे तर इतक्या तत्परतेने संपवले असते का हे गुंड ?? असंगाशी संग प्राणाशी गाठ ------------------------------------------------------------- ऍन्टॉप हिल येथे पोलिसाला मारहाण घ्या !! आत...