Posts

Showing posts with the label hopeless india

दीपक मानकर यांचे निलंबन मागे???

अरे काय थट्टा आहे.. असल्या गुंडाला राजमान्यता मिळाली.. हाच आदर्श समोर ठेवला आहे का कॉंग्रेस ने? अजून किती करणार आहात राजकारणाचे गुन्हेगारीकरण ?? म्हणजे हा चोर सरळ आता पोलिसांना दटावाणार.. ऱ्हास.. भारताचा शेवट फार दूर नाही.. --------------------------------------- रॅगिंगप्रकरणी १८ विद्यार्थ्यांची वसतिगृहातून हकालपट्टी नुसते हाकलाताय??? त्यांची धिंड का नाही काढलीत गाढवावरून ? --------------------------------------- ऑस्ट्रेलियासोबतचे संबंध धोक्यात - कृष्णा वा !! म्हणजे एक खून झाला तर संभंध धोक्यात? आणि जर तो दुर्दैवी माणूस भारतात मेला असता तर थोबाड वर करून पहिले तरी असते का ? इथे कसाब ने १७० लोक मारले तरी आहे न जिवंत तो ? आपल्या भूमीत काही पण चालते ? म्हणजे ऑस्ट्रेलिया वर प्रेशर टाकायलाच हवे त्याबद्दल वाद नाही.. मुलांनो ऑस्ट्रेलिया मध्ये १-२ नाहीतर लाखोंच्या संख्येने जा. तिथल्या लोकांना ब्राऊन माणूस गैर वाटला नाही पाहिजे.. असल्या भ्याड हल्ल्यांनी काहीही होणार नाही.. --------------------------------------- शस्त्रे खाली ठेवा मगच चर्चा करू हे अगदी बरोबर आहे.. नुसत्या शाळा उडवतात मूर्ख लेका...

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री लक्ष्मण ढोबळे ची मुक्ताफळे

"राज्यामध्ये पीक मोठ्याप्रमणात येत आहे. त्याला चांगला भाव मिळावा म्हणून डिस्टलरीला मान्यता दिली, मद्यनिर्मितीचाही निर्णय घेतला." आता याला काय म्हणावे.. महागाई वाढली आहे आणि एकाचा पगार पुरत नाही म्हणून दोघांना नोकरी करावी लागते.. तूर डाळ १०० च्या वर गेली आहे, फळभाजी १० रुपये पाव च्या खाली नाही, तीच गत पालेभाजीची.. आणि मग हे सगळे काय खूप पीक येते म्हणून ? प्यायला पाणी नाही तर शेतीला कुठून देणार. आणि हे महान माननीय आणि अतिशय कमी बुद्धी असलेले आपले मंत्री म्हणत आहे कि राज्यात पीक मोठ्या प्रमाणात येत आहे म्हणून त्यापासून मद्य निर्मिती करावी.. स्वतःच काही नशेत आहे कि काय तपासावे लागेल.. असले येडपट मंत्री म्हणे महाराष्ट्राला पुढे नेणार.. थू ह्यांच्यावर..

माजले बिल्डर आणि इतर

बिल्डरच्या गुंडांची मारहाण हे तर नेहेमीचेच आहे.. आज जाग आली काय?? बिल्डर लोक असा चोरून FSI नेहेमीच विकत असतात.. आणि त्यांना कधीच शिक्षा होत नाही.. कारण महापालिके पासून, पोलीस, नगरसेवक आणि टाऊनशिप प्लांनिंग च्या सर्व कुत्र्यांना त्यांनी तुकडा टाकलेला असतो.. असली हि बिल्डर ची जात ठेचायला पाहिजे.. नुसते हेच नाहीतर रिकाम्या प्लॉटमध्ये तर खूप घोटाळे करतात. एक प्लॉट ४ लोकांना विकतील, अतिक्रमण करील, जर जागा रिकामी असली तर लगेच तिथे अतिक्रमण करतील आणि तिथे कुठल्या तरी राजकीय बिल्डरची पाटी लावतील म्हणजे जर कुणी आलेच तर धाक बसेल.. आणि मग लोकल गुंड लोक आणि बिल्डर ती जागा हडप करून त्यावर बिल्डींग बांधतील आणि विकतील.. ज्याची जमीन गेली त्याला जर नशीब असले तर थोडे फार पैसे मिळतील नाहीतर ते पण नाही.. पोलीस लोक FIR लिहून घायचे पैसे घेतात.. आणि जर सरळ मार्गाने त्यांना सांगितले तर तुमच्यावरच कसलातरी फालतू गुन्हा दाखल करतात.. साले सगळेच हलकट.. सरकार कुठल्याही पक्षाचे असो.. त्यांचे एकच काम पैसे खाणे.. लोकांशी काहीही देणे घेणे नाही.. --------------------------------------------------------------------------...

न्यायाचे धिंडवडे

बलात्काराची राजधानी असलेल्या दिल्ली च्या बाजूचे हरियाना, इथे १९ वर्षापूर्वी एका हलकट पोलीस अधिकार्याने एका १४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला.. त्या बलात्कार नंतर त्या मुलीच्या कुटुंबाला पोलिसांनी दिलेला त्रास आणि त्यातूनही ती केस दाबण्याचा प्रयत्न केवळ संतापजनक आहे.. आणि आपल्या भिक्कार न्यायालयाने १९ वर्षांनी त्या नराधम पोलीस अधिकार्याला किती सजा द्यावी ? सहा महिने सक्तमजुरी ?? अरे जिथे अल्पवयीन मुलीवर बलात्काराला फाशी व्हावी तिथे फक्त ६ महिने.. न्यायाधीश काय नशेत आहे का ? कि त्याला पण दिलेत पैसे आणि केले थोबाड गप्प? कसा सामान्य जनता विश्वास ठेवणार ह्यांच्यावर ? हे तर न्यायावर आणि न्यायालयावर लघुशंका केल्यासारखे आहे.. आणि ह्या नराधम राठोडला पोलिस महासंचालकपदावर बढती दिली.. हे असले सरकार आणि हे असले न्यायालय.. मी थुंकतो असल्या न्यायव्यवस्थेवर.. राठोडला निवृत्तीनंतर सात वर्षांनी शिक्षा सुनावली जावी हे या व्यवस्थेचे यश नसून, तो ही व्यवस्था किती सडलेली आहे, याचा लाजिरवाणा पुरावाच आहे.. कुणी "रंग दे बसंती" मधल्यासारख्या वीरांनी ह्या असल्या सडक्या लोकांना शिक्षा दिली पाहिजे.. आपण क...