Posts

Showing posts from November, 2009

करकरे यांच्या बुलेट प्रुफ जाकीटाचा घोळ

हे लोकसत्ता मधले सदर वाचले वाचले आणि सुन्न झालो.. http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=27860:2009-11-29-20-41-38&catid=73:mahatwachya-baatmyaa&Itemid=104 हे जर खरे असले तर मात्र आपली यंत्रणा पूर्ण संपलेली आहे.. जर ३ अति वरिष्ट अधिकारी फक्त बुलेट प्रुफ जाकीट च्या खरेदी साठी अमेरिकेपर्यंत जाऊन निकृष्ट जाकिटे विकत घेत असतील तर या देशाचे खरच कठीण आहे.. म्हणजे मिळणाऱ्या लाचेपोटी आपल्याच सहकाराचा जीव धोक्यात टाकायचा.. आणि सरकार तरी का चाल ढकल करत आहे या बाबत.. सरकार मधल्या काही हलकट लोकांचे तर काही संबंध गुंतले नाही न यात.. करकरे यांचे जाकीट गहाळ झाले.. ती फाईल गहाळ झाली.. हि काय करणे आहेत कि काय.. करकरे यांच्या जिवाला धोका असल्याची इंटिलिजन्स ब्युरोची माहिती असल्यामुळे करकरे यांना चंदेरी रंगाची खास बुलेटप्रूफ टाटा सिएरा गाडी (एमएच ०१ एसए १८८१) देण्यात आली होती. परंतु आश्चर्यकारकरीत्या २६/११ च्या हल्ल्याच्या आधी चार दिवस ही गाडी काढून घेण्यात आली होती. याचा अर्थ काय लावावा? मुश्रीफ यांनी लिहिले पुस्तक खरे म्हणावे कि काय? "हु किल्ड करक...

NRI ना मायदेशी परतण्याचे आवाहन - मनमोहन सिंग

२६/११ च्या दिवशी हि बातमी वाचून अचंबा वाटला... मनात आले कशाला NRI भारतात कशाला परत येतील ? मरायला ?? २६/११ ला १६० लोक मेलेत त्यांना आपण फक्त श्रद्धांजली वाहतो.. शूरवीर हेमंत करकरे आणि साळसकर यांच्यासारखे पोलीस धारातीर्थी पडलेत.. हल्लेखोर कसाब मस्तपैकी बिर्याणी झोडतोय तुरुंगात.. आज वर त्याच्या ३१ कोटी रुपये सरकारने खर्च केलेत... त्याचे इतर हलकट मेलेले साथीदार करदात्यांच्या पैशांनी शवागारात आहेत.. कशा साठी ?? माहित नाही.. भारत काय सिद्ध करू इच्छितो याने ? माहित नाही.. या हलकट लोकांना कधी शिक्षा होणार का.. माहित नाही.. पोलिसांमध्येच सुसंगत co-ordination नाही त्यामुळे काही पोलीस हल्लेखोरांचा मुकाबला करण्यासाठी रस्त्यावर उतरलेच नाहीत.. याला काय म्हणावे?? कि देशावर हल्ला होतो आहे याची त्यांना अजिबात चाड नाही?? दावूद इब्राहीम सारख्या चे अजून आपल्या देशात जाळे आहे आणि ते कित्येक वेळा दहशतवादी हल्य्यांसाठी वापरले गेले आहे.. अजून ते का अस्तित्वात आहे ?? त्यातून हे राम मंदीर आणि बाबरीचे भूत परत मानगुटीवर बसले आहे.. प्रत्येक राजकारणी पक्ष त्याचे क्रेडीट घेण्यासाटी तरफडत आहे.. पण का ?? बाबरी पडली आ...

कसाबवर ३१ कोटीचा खर्च झालाय

लांछनास्पद बातमी आहे हि.. भारत सरकार जगाला नक्की काय सिद्ध करून दाखवू इच्छिते ?? कि आम्ही किती महान न्याय दाते आहोत ?? आणि तो हलकट अजून मागण्या वाढवतोय.. त्याला चांगले जेवण हवे.. वाचायला उर्दू वर्तमान पत्र हवे.. पुस्तके हवीत.. इथे ज्या लोकांच्या तोंड चा घास त्याने हिसकावला त्याची काहीही चाड नाही सरकारला.. आणि असल्या नराधमाचे चोचले पुरवत आहेत.. हेच का आपले लोकमान्य सरकार ?? म्हणजे सरकारला अतिरेकी आणि गुन्हेगारांवर खर्च करायला हवा आणि पोलिसांना नवीन हत्यारे द्यायला खर्चाला परवानगी आणि लाल फीत?? असे कसे.. कसाबसाठी आर्थर रोड जेलमध्ये बुलेटप्रुफ आणि बॉम्बप्रुफ असे खास तुरुंग (स्पेशल सेल) तयार करण्यात आले आहे. स्फोटकांनी भरलेला ट्रक जोरात आपटला तरी या तुरुंगात ठेवलेल्या कसाबला काहीही होऊ नये अशी व्यवस्था करण्यात आली आहे. जे जे हॉस्पिटलच्या आवारातही कसाबसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तब्येत बिघडल्यास कसाबला ताबडतोब जे जे मध्ये आणून त्याच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांची फौज सज्ज आहे. मागील काही महिन्यात कसाबला जे जे मध्ये नेण्याची वेळ आली नसली तरी वेळ पडल्यास त्याच्या प्रकृतीची ह...

विचार - बलात्कार कसे थांबवावेत

रोज पेपर मध्ये कमीत कमी ३ बातम्या बलात्काराच्या असतात.. काहीतर इतक्या भयंकर असतात कि वाचून रक्त सळसळते आणि असे वाटते कि उठावे आणि सरळ ह्या बलात्कार्यांच्या डोक्यात दगड घालून त्यांना संपवावे.. कुणा निष्पाप व्यक्तीवर जबरदस्ती करायचा ह्या नालायक लोकांना काय अधिकार ?? आणि माहित असून देखील त्या मुलीचे किंवा बाई चे नातेवाईक काहीच का नाही करत.. किती संताप जनक आहे आहे हे सगळे.. "मतिमंद मुलीवर सामूहिक बलात्कारप्रकरणी चौघांना अटक" (http://epaper.esakal.com/esakal/20091125/5603600513670594021.htm) हे किती निघृण कृत्य आहे.. मला वाटते जर हे प्रकार थांबवायचे असतील तर एकाच उपाय.. बालात्कार्यांना सरळ २ गोळ्या घालाव्यात.. खरे तर हि खूपच सौम्य शिक्षा आहे.. त्यांना मरे पर्यंत मारले पाहिजे.. त्याशिवाय हे थांबणारच नाही.. कारण ह्या गुन्ह्याला काही शिक्षाच असू शकत नाही.. सक्तमजुरी आणि कैद हि काही यावर शिक्षा नव्हे.. एका निष्पाप जीवाचे आयुष्य बरबाद करण्याला कैद !! आपली महान न्याय व्यवस्था असे गुन्हे गभीर पणे कधी बघणार? सदोष मनुष्यावधा इतकाच बलात्कार देखील गंभीर आहे.. जळगाव, मिरज सेक्स कांड मध...